निष्पाप बालकाला बाथरूममध्ये कोंडले; जाब विचारणाऱ्या मातेला बेदम मारहाण

KHOZ MASTER
1 Min Read

Sangrampur

संग्रामपूर तालुक्यातील काकनवाडा बुद्रुक येथे संतापजनक प्रकार

 तालुक्यातील Kakanwada Budruk येथे माणुसकीला काळिमा फासणारी संतापजनक घटना उघडकीस आली आहे. किरकोळ कारणावरून एका ८ वर्षांच्या निष्पाप बालकाला बाथरूममध्ये कोंडून ठेवण्यात आले. याबाबत जाब विचारण्यासाठी गेलेल्या आईला तीन महिलांनी शिवीगाळ करत बेदम मारहाण केल्याची घटना घडली.

या प्रकरणी Tamgaon पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काकनवाडा बुद्रुक येथील रहिवासी Maya Wakode (वय २७) या शेतमजुरी करून उदरनिर्वाह करतात. १८ मार्च २०२६ रोजी दुपारी सुमारे १२ वाजता त्या शेतातील काम आटोपून घरी परतल्या असता त्यांचा ८ वर्षांचा मुलगा Bhavesh Wakode रडत असल्याचे दिसले. चौकशी केली असता आरोपी महिलांनी त्याला घराच्या बाथरूममध्ये कोंडून ठेवल्याचे समोर आले.

आपल्या मुलाला अशा प्रकारे कोंडून ठेवलेले पाहून माया वाकोडे यांनी आरोपींकडे जाब विचारला. यावेळी आरोपी Kanchan Rajdhan Sonone, Nandani Ajay Sonone आणि Indubai Laxman Sonone यांनी त्यांना घेरून अश्लील शिवीगाळ केली. तसेच चापटा व बुक्क्यांनी बेदम मारहाण करत “तुला जिवंत सोडणार नाही” अशी धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

भरदिवसा घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात संतापाची लाट पसरली असून गावातील कायदा व सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पीडित महिलेच्या तक्रारीवरून Tamgaon पोलिसांनी आरोपी महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

0 9 4 5 4 6
Users Today : 11
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *