Sindkhed Raja
योजनेचा लाभ घेण्याचे बीडीओ अजित बांगर यांचे आवाहन
Pradhan Mantri Awas Yojana Gramin टप्पा दोन तसेच सन २०२४–२५ मधील राज्य पुरस्कृत आवास योजनेंतर्गत घरकुल मिळालेल्या लाभार्थ्यांसाठी केंद्र व राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. Pradhan Mantri Surya Ghar Yojana अंतर्गत घरांच्या छतावर सौर ऊर्जा प्रकल्प बसविण्यासाठी अनुदान उपलब्ध करून देण्यात येत असून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन गटविकास अधिकारी Ajit Bangar यांनी केले आहे.
या योजनेनुसार घरकुल लाभार्थ्यांना त्यांच्या घराच्या छतावर १ किलोवॅटपर्यंत सौर ऊर्जा प्रणाली बसविण्यासाठी केंद्र शासनाकडून ३० हजार रुपये आणि राज्य शासनाकडून १५ हजार रुपये असे एकूण ४५ हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील वीज ग्राहकांना सौर ऊर्जेमुळे स्वयंपूर्ण बनवणे, तसेच वीज खर्च कमी करून अतिरिक्त उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण करणे हा आहे.
छतावरील सौर ऊर्जा निर्मिती वाढविणे आणि पर्यावरणपूरक ऊर्जेला प्रोत्साहन देणे हाही या योजनेचा महत्त्वाचा हेतू आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याकडे Maharashtra State Electricity Distribution Company Limited ची वैध वीजजोडणी असणे आवश्यक आहे. त्यानंतर ‘पीएम सूर्यघर’च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन नोंदणी करावी लागते. नोंदणी झाल्यानंतर महावितरणमार्फत अर्जाची पडताळणी केली जाते.
पडताळणी पूर्ण झाल्यानंतर अधिकृत विक्रेत्यामार्फत घरावर सौर यंत्रणा बसविण्यात येते. ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन असून विक्रेते लाभार्थ्यांना आवश्यक मार्गदर्शन करतात. मात्र सौर संच बसविण्याचा खर्च लाभार्थ्यांना सुरुवातीला स्वतः करावा लागतो आणि त्यानंतर अनुदान त्यांच्या खात्यात जमा केले जाते.
घरकुल लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतल्यास त्यांना स्वस्त, अखंडित आणि पर्यावरणपूरक वीजपुरवठा मिळण्यास मदत होईल, असे गटविकास अधिकारी Ajit Bangar व विस्तार अधिकारी Amruta Shinde यांनी सांगितले.
Users Today : 11