Masru –
येथील मुस्लिम बांधवांसाठी Manoj Dandge यांच्या वतीने गुरुवार, १९ मार्च २०२६ रोजी आयोजित इफ्तार पार्टी उत्साहात पार पडली. सामाजिक सलोखा आणि आपुलकी जोपासण्याच्या उद्देशाने सलग दुसऱ्या वर्षी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
रोजा सोडण्यासाठी कार्यक्रमात विविध प्रकारच्या फळे व अल्पोपहाराची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. सायंकाळी नमाजच्या वेळेस सर्व मुस्लिम बांधवांनी एकत्र येत रोजा सोडला. यावेळी परिसरात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
यावेळी बोलताना Manoj Dandge यांनी तराडखेड परिसरातील सर्व बांधवांसोबत रमजानचा आनंद साजरा करता आला याचा आनंद व्यक्त केला. अत्यंत शिस्तबद्ध आणि सुंदर नियोजनात हा इफ्तार सोहळा पार पडल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला Jamthi येथील Ganesh Tayade, Shailesh Sonune, तसेच Masrul येथील Vijay Gaikwad, Shubham Narwade, Dhamangaon येथील Satish Sapkal, Samadhan Shinde, Anil Mahale यांच्यासह तराडखेड परिसरातील प्रतिष्ठित नागरिक, तरुण व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थितांनी या उपक्रमाचे स्वागत करत Manoj Dandge यांचे आभार मानले.
Users Today : 11