१९८ शेतकऱ्यांचे १०२ हेक्टर क्षेत्र बाधित; गहू, हरभरा, मक्याचे प्रचंड नुकसान
Motala
तालुक्यात १८ व १९ मार्च रोजी झालेल्या अवकाळी पाऊस, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यामुळे १६ गावांतील शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे १९८ शेतकऱ्यांचे सुमारे १०२ हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे.
खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे आधीच शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा रब्बी पिकांवर होत्या. मात्र कापणीसाठी तयार असतानाच झालेल्या अवकाळी पावसामुळे गहू, ज्वारी, मका, कांदा व हरभरा या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी गव्हाची पिके आडवी पडली असून मक्याची कणसे तुटून पडली आहेत.
झाड कोसळून बैल ठार
तालुक्यातील Talni येथे वादळी वाऱ्यामुळे झाड कोसळून बैल ठार झाल्याची घटना घडली. शेतकरी Nilkanth Waman Bharambe यांनी गोठ्यात बांधलेल्या बैलावर वायकर्णीचे झाड कोसळल्याने बैल जागीच ठार झाला. या घटनेत त्यांचे सुमारे ५५ हजार रुपयांचे नुकसान झाले.
घटनास्थळी ग्राम महसूल अधिकारी R. R. Shelke यांनी भेट देऊन पंचनामा केला असून अहवाल तहसील प्रशासनाकडे पाठविण्यात आला आहे. यावेळी सहाय्यक कृषी अधिकारी D. K. Bendmali, ग्रामसेवक M. M. Raut, पोलीस पाटील Gajanan Narkhede, तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते.
शेतकऱ्यांचा तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. नुकसानीचा तातडीने सर्वे करून शासनाने शेतकऱ्यांना सरसकट मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
Users Today : 11