सिंदखेड राजा –
तालुक्यातील Malkapur Pangra येथील ग्रामसचिवालयात वर्षभरासाठी घेतल्या जाणाऱ्या आठवडी बाजाराचा लिलाव अखेर रद्द करण्यात आला. शासकीय दर व वसुलीच्या नियमांविषयी माहिती देताच व्यापारी व इच्छुक लिलावधारकांनी तीव्र आक्षेप घेत नियमांनुसार वसुली करावी, अशी मागणी केली. ठेकेदारांना ही अट परवडत नसल्याने लिलावस्थळी गोंधळ निर्माण झाला आणि अखेर लिलाव प्रक्रिया रद्द करण्यात आली.
मलकापूर पांग्रा येथील आठवडी बाजार हा Buldhana district मधील एक महत्त्वाचा व प्रसिद्ध बाजार मानला जातो. मागील वर्षी या बाजाराचा लिलाव ६ लाख ६८ हजार रुपयांत झाला होता. यावर्षीची मुदत संपत आल्याने ग्रामविकास अधिकारी व विस्तार अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली दुपारी एक वाजता ग्रामसचिवालयात लिलाव प्रक्रिया सुरू करण्यात आली.
यावेळी बाजारातील वसुलीबाबत शासकीय नियम स्पष्ट करण्यात आले. त्यानुसार प्रत्येक दुकानदाराकडून किमान २५ रुपये व जास्तीत जास्त ४० रुपये इतकीच वसुली करणे बंधनकारक असल्याचे सांगण्यात आले. तसेच या वर्षासाठी लिलावाची किमान किंमत ५ लाख ७० हजार रुपये निश्चित करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
मात्र यापूर्वी लिलावधारकांकडून दुकानदारांकडून अवाजवी वसुली होत असल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला. शासकीय नियमांनुसार मर्यादित वसुली करून इतकी मोठी रक्कम जमा होणे शक्य नसल्याने किमान बोलीची रक्कम कमी करावी, अशी मागणी व्यापारी वर्गाने केली. गोरगरीब दुकानदारांवर अन्याय होऊ नये म्हणून नियमांनुसारच वसुली व्हावी, असा जोरदार आग्रहही त्यांनी धरला.
या मागण्यांवरून व्यापारी व लिलावधारक आक्रमक झाल्याने लिलावस्थळी काही काळ गोंधळ निर्माण झाला. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे लक्षात घेऊन अधिकाऱ्यांनी लिलाव प्रक्रिया स्थगित करत अखेर लिलाव रद्द करण्याचा निर्णय घेतला.
या वेळी विस्तार अधिकारी Rajeshwar Pawar, ग्रामविकास अधिकारी Kharat व Udyog Gaikwad, सरपंचपती Yadav Tale, ग्रामपंचायत सदस्य Namdev Ugle, Saber Khan Pathan, Gawande, पोलीस पाटील Sonne, Bhagwan Salve, Arshad Khan यांच्यासह व्यापारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Users Today : 11