धावत्या रेल्वेतून पडून अनोळखी इसमाचा मृत्यू

KHOZ MASTER
1 Min Read

खामगाव

Mumbai–Howrah railway line वरील Jalamb railway station दरम्यान धावत्या रेल्वेतून पडून एका अनोळखी इसमाचा मृत्यू झाल्याची घटना १९ मार्च रोजी उघडकीस आली. याप्रकरणी Jalamb Police Station येथे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लोको पायलट Pranay Kumar यांच्या वतीने रेल्वे कर्मचारी Sheikh Akhtar Sheikh Anwar (वय २५, रा. रेल्वे स्टेशन परिसर, जळंब) यांनी पोलिसांना माहिती दिली. १९ मार्च २०२६ रोजी मध्यरात्री १२.२४ वाजेच्या सुमारास रेल्वे खांब क्रमांक ५२५/२२-२४ (अप लाईन) जवळ एक अनोळखी इसम मृतावस्थेत पडलेला आढळून आला.

लोको पायलटने दिलेल्या लेखी मेमोवरून पोलिसांनी या घटनेची नोंद केली आहे. प्राथमिक अंदाजानुसार संबंधित इसमाचा मृत्यू धावत्या रेल्वेतून खाली पडल्यामुळे झाल्याचे समोर येत आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक Sunil Dev यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मृताची ओळख पटविण्याचे काम सुरू असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे.

सदर मृत व्यक्तीबाबत कोणाला काही माहिती असल्यास Jalamb Police Station शी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

0 9 4 5 4 6
Users Today : 11
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *