जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन
बुलढाणा –
राज्यात घरगुती व व्यावसायिक गॅसचा वाढता तुटवडा आणि दरवाढ याविरोधात Shiv Sena (Uddhav Balasaheb Thackeray) महिला आघाडीने आक्रमक भूमिका घेतली आहे. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.
सध्या Gudhi Padwa व Ramadan सारख्या सणासुदीच्या काळातही गॅसचा गंभीर तुटवडा निर्माण झाल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. गॅस सिलिंडर बुक केल्यानंतर वेळेवर सिलिंडर मिळत नसल्याने तसेच बुकिंग प्रक्रिया सुरळीत नसल्यामुळे नागरिकांना तासन्तास रांगेत उभे राहावे लागत असल्याची तक्रार करण्यात आली.
निवेदनात अधिकृत प्रक्रियेत गॅस उपलब्ध नसताना अतिरिक्त दोन ते अडीच हजार रुपये दिल्यास सहज सिलिंडर मिळत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे गॅस वितरणात काळाबाजार सुरू असून सामान्य नागरिकांची आर्थिक लूट होत असल्याचे नमूद करण्यात आले.
घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात करण्यात आलेली ६० रुपयांची वाढ तात्काळ मागे घ्यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. तसेच व्यावसायिक गॅसचा पुरवठा ठप्प झाल्यामुळे हॉटेल, खानावळ व लघुउद्योजकांवर गंभीर परिणाम होत असून हजारो कुटुंबांचा उदरनिर्वाह धोक्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे.
गॅस पुरवठा सुरळीत करणे, बुकिंग प्रक्रियेत पारदर्शकता आणणे, काळाबाजार रोखण्यासाठी कठोर कारवाई करणे, व्यावसायिक गॅसचा पुरवठा तात्काळ पूर्ववत करणे तसेच बाधित व्यावसायिकांना आर्थिक मदत जाहीर करण्याची मागणी करण्यात आली. सरकारने या प्रश्नाकडे तातडीने लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला.
Users Today : 2