अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश

KHOZ MASTER
1 Min Read

बुलढाणा –

जिल्ह्यात १८ आणि १९ मार्च रोजी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर बाधित पिकांचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे निर्देश केंद्रीय राज्यमंत्री Prataprao Jadhav यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.

जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस आणि गारपीट झाली. या अवकाळी पावसामुळे गहू, कांदा, मका, ज्वारी यांसह मोसंबी, केळी आणि डाळिंब या फळपिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.

प्राथमिक माहितीनुसार Buldhana जिल्ह्यातील तब्बल २०१ गावांमधील सुमारे ३ हजार ८०२ हेक्टर क्षेत्रावरील पिकांना फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी पंचनाम्यांची प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

ना. जाधव यांनी जिल्हा प्रशासनाला निर्देश देताना सांगितले की, बाधित पिकांचे अचूक पंचनामे करून शासनाकडे अहवाल सादर करावा, जेणेकरून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शक्य तितक्या लवकर आर्थिक मदत मिळू शकेल.

दरम्यान, अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचे उभे पीक जमीनदोस्त झाले असून, शासनाकडून तातडीच्या मदतीची अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत

0 9 4 5 3 7
Users Today : 2
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *