लोणार–
तालुक्यातील Chincholi Sangle येथे किराणा दुकानाला अचानक लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे किराणा व साहित्य जळून खाक झाल्याची घटना २१ मार्च रोजी दुपारी सुमारे दोन वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात काही काळ मोठी खळबळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार, गावातील व्यापारी Vitthal Kute यांच्या किराणा दुकानातून अचानक धूर निघताना स्थानिक नागरिक Deepak Sangle यांच्या निदर्शनास आला. त्यांनी तातडीने ही माहिती गावकऱ्यांना दिली. मात्र, काही वेळातच आगीने भीषण रूप धारण केले आणि दुकानात मोठ्या प्रमाणावर साठवलेला किराणा माल जळू लागला.
घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी Nandkishor Mapari यांना कळविले. त्यांनी तातडीने अग्निशमन दलाशी संपर्क साधला. तोपर्यंत गावातील नागरिक व तरुणांनी स्वतः पुढाकार घेत फवारणी यंत्रांच्या ट्रॅक्टरमध्ये पाणी भरून आणले. तसेच चार टँकर आणि अग्निशमन दलाच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले.
या आगीत दुकानातील किराणा माल, फर्निचर आणि इतर साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले असून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
घटनेची माहिती मिळताच Santosh Aghav, सरपंच Dr. Punjabrao Ghughe, माजी सरपंच Abhimanyu Sangle यांच्यासह संतोष सांगळे, रामेश्वर सांगळे, शिवानंद सांगळे, पंढरी सांगळे, साहेबराव पाईकराव, दुनियदास कांबळे, सुभाषराव कांबळे, अंकुश सांगळे, देविदास कांबळे, अमोल सांगळे आदींसह अनेक गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
दरम्यान, या घटनेचा तात्काळ पंचनामा करून नुकसानग्रस्त व्यापाऱ्याला मदत मिळावी, यासाठी Nandkishor Mapari यांनी Bhushan Patil तसेच Maharashtra State Electricity Distribution Company Limited चे अभियंता बोबडे यांना दूरध्वनीद्वारे माहिती दिली असल्याचे सांगण्यात आले आहे.
Users Today : 2