Buldhana, दि. २१ (प्रतिनिधी):
जिल्ह्यातील विविध भागात रमजान ईद अर्थात Eid‑ul‑Fitr मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात साजरी करण्यात आली. अनेक ठिकाणी हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकत्र येत सामाजिक सलोखा आणि बंधुभावाची परंपरा जपल्याचे पाहायला मिळाले.
जवळच असलेल्या Sagwan येथील इदगावमध्ये २१ मार्च रोजी मुस्लिम बांधवांनी रमजान ईद उत्साहात साजरी केली. यावेळी गावातील हिंदू बांधवांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देत गळाभेट घेतली. यावेळी रमन राजपूत, सुनील सोनुने, देवा दाडंगे, रवींद्र भाकरे, किशोर आहेर, पुडलीक सोनुने, रामदास काकडे, किसन तायडे, नीलेश इंगळे, विजय सोनुने, सचिन सोनुने, अनवर चौधरी, महेबुब चौधरी, सलमान चौधरी, असलम पेंटर, अयुब पठाण, ईमरान पठाण, दानिश पठाण, फारुख बागवान, सरोवर बागवान, अनिस सर, शेख सिकंदर, रहुप बागवान, हरुण कंडक्टर, निसार बागवान, रशीद बागवान, जुनेद बागवान, समीर बागवान, ईमरान चौधरी, राजू बागवान आदी उपस्थित होते.
दरम्यान, Motala येथे २२ मार्च रोजी रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. मोताळा येथील ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज पठण केले. Madina Jama Masjid चे इमाम मौलाना मोहम्मद अकबर आलम यांच्या नेतृत्वाखाली सकाळी साडेनऊच्या सुमारास विशेष नमाज अदा करण्यात आली. नमाजनंतर विश्वशांती, सामाजिक एकोपा आणि बंधुभाव कायम राहावा यासाठी विशेष प्रार्थना करण्यात आली. या ठिकाणी बोराखेडीचे ठाणेदार सिताराम मेहत्रे, नगरसेवक गणेश पाटील, सचिन हिरोडे, नवल शंबर, डॉ. शरद काळे, गजानन मामलकर, नीना घनोकार, रमेश धूनके, पत्रकार पप्पू राठी, ज्ञानेश्वर जवरे, विष्णू शिराळ, गोपाल काटे व पोलिस कर्मचाऱ्यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
तसेच Dhamangaon Badhe येथेही रमजान ईदचा सण अत्यंत उत्साहात आणि मंगल वातावरणात साजरा करण्यात आला. सकाळपासूनच मुस्लिम बांधव नमाजसाठी जामा मशीद परिसरात जमा झाले होते. त्यानंतर ईदगाह मैदानावर सकाळी ८:१५ वाजता मौलाना हाफिज आमीन यांच्या मार्गदर्शनाखाली नमाज अदा करण्यात आली. शाही मशीद मरकज येथे हाफिज आरिफ यांच्या उपस्थितीत नमाज पठण झाले. नमाजनंतर देशात सुख, शांती आणि समृद्धी नांदावी यासाठी सामूहिक दुवा करण्यात आली.
ग्रामपंचायत प्रांगणात आयोजित कार्यक्रमात गावातील हिंदू बांधवांनी मुस्लिम बांधवांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी शिवसेना नेते अॅड. गणेशसिंग राजपूत, भोजराज पाटील, धनराज महाजन, सरपंच मोहन सपकाळ, भागवत दराखे, रामदास चौथनकर, उद्देमान शेलेकर, शिवसेना शाखा प्रमुख राजेश जाधव, भाजप जिल्हा उपाध्यक्ष गजानन घोंगडे, किसन भोरे, मुकुंदा श्रीसागर, डॉ. गणेश हुडेकर, गजानन शेलेकर आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ठाणेदार नागेश जावले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता.
तसेच Chandol येथेही रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज पठण केली. नमाजनंतर देशात शांतता आणि हिंदू-मुस्लिम ऐक्य अबाधित राहावे यासाठी विशेष दुवा करण्यात आली. यावेळी सर्वधर्मीय नागरिकांनी एकमेकांना गळाभेट देत शुभेच्छा दिल्या. धाड पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रताप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर केंद्रे, बीट जमादार रवि चव्हाण, पोलिस कर्मचारी नितीन इंगळे व होमगार्ड उपस्थित होते.
रमजान ईदच्या निमित्ताने जिल्ह्यात सर्वत्र सामाजिक एकोपा, बंधुभाव आणि धार्मिक सलोखा याचे सुंदर दर्शन घडले.
Users Today : 2