लोकस्वतंत्र पत्रकार महासंघाची शासनाकडे मागणी.

Khozmaster
2 Min Read

वार्षिक सर्व साधारण सभेत जाहिरात वितरण आणि पडताळणी सुलभ करण्याची मागणी.

 

प्रतिनिधी लुकमान शहा

अकोला… कोरोना काळातील आर्थिक नुकसानाचे बिकट परिस्थितीत संघर्ष करणाऱ्या महाराष्ट्रातील पत्रकारांच्या समस्यांची गंभीर देणे दखल घ्यावी.

समस्याग्रस्त पत्रकारांना प्राधान्य न्याय देण्याची प्रयत्न करावेत अशी मागणी लोक स्वतंत्र पत्रकार महासंघ या अकोला येथून स्थापित समाजी भिमुख राष्ट्रीय संघटनेने शासनाकडे केली आहे पत्रकार महासंघाचा मासिक विचार मंथन वार्षिक सर्वसाधारण सभा स्नेह मिलन आणि सत्कार समारंभ स्थानिक जठार पेठातील जैन रेस्ट येथे नुकताच आयोजित करण्यात आला होता. प्रथम सत्रातील वार्षिक सर्वसाधारण सभेनंतर जेष्ठ पत्रकार, दैनिक देशोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाश भाऊ पोहरे यांचे अध्यक्ष खालील वार्षिक स्नेह मिलन तथा सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रकाशमान पोहरे यांची इंडियन लैंग्वेज न्यूज पेपर असोशियन या देशभरातील सर्व भाषिक वृत्तपत्र संपादक-प्रकाश कांचा राष्ट्रीय संघटनेच्या उपाध्यक्षपदी तिसऱ्यावेळी निवड झाल्याबद्दल त्यांचा व याच राष्ट्रीय कार्यकारिणीतील निवळीबद्दल लोक स्वतंत्र संस्थापक-राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम. देशमुख यांचाही सत्कार करण्यात आला.

 

प्रथम सत्रात संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम देशमुख यांचे अध्यक्ष खालील वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. त्यामध्ये कार्याध्यक्ष बाळासाहेब आंबेकर, उपाध्यक्ष प्रदीपजी खाडे, किशोर मानकर, सचिव राजेंद्र देशमुख, मार्गदर्शक पदाधिकारी प्रा.डॉ.संतोष जी हूशें, शासनाच्या साहित्य व सांस्कृतिक मंडळाचे सदस्य पुष्पराज गावंडे, अँड.राजेश जाधव, अंबादास तल्हार, संदीप देशमुख, हे केंद्रीय पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. विषय वाचन सचिव राजेंद्र देशमुख यांनी तर अध्यक्ष संजय एम.देशमुख यांनी सभेचे कामकाज माहिती दिल.

 

0 9 4 5 9 2
Users Today : 6
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *