ग्राम पंचायत सवणा मार्फत १५ व्या वित्त आयोगाचे कामास गैरकायदेशिर स्थगिती दिल्या बाबत. मुख्यकार्यकारी अधिकारी ला दीले निवेदन

Khozmaster
2 Min Read

ग्राम पंचायत सवणाचा निर्वाचित सदस्य यांनी लोकनियुक्त प्रतिनिधी कय्युम शाह वाड नं. ३ करिता १५ व्या वित्त आयोगा मार्फल जनरल वस्तीत १. अमामुल्ला खान ते शेख रऊफ कोतवाल, २. शे. इरफान शे. नसिम ते कादर शाह यांचे घराकडे जाणारा रस्ता ३. कादर शाह ते नसिर कोतवाल यांचे घराकडे जाणारा रस्ता, ४. दिनकर सोलाट ते अशोक शेळके यांचे घराकडे जाणारा रस्ता ५ तेजराव चोपडे ते तोताराम गाढवे यांचे घराकडे जाणारा रस्ता तरतूद ६,००,०००/- रु (सहा लाख रूपये) अशी विकास कामे दिनांक २७.०५.२०२२ रोजी मासिक सर्वसाधारण सभा ठराव क्रमांक ७ नुसार सर्वसंमतीने मंजूर करून घेतलेली आहेत.सदर कामाची रितसर ई- निविदा काढण्यात आली व सदर कामाचे कंत्राट हे कंत्राटदार श्री. गोपाल शालीकराम डुकरे रा. देऊळगांव धनगर ता. चिखली जि. बुलडाणा यांना ग्राम पंचायत कार्यालय, सवणा राय मा. क्र. २४५/२०२२ दिनांक १३/०४/२०२२ चे वर्क ऑर्डर नुसार देण्यात आले. सदर वर्क ऑर्डर वरून संबधीत कंत्राटदाराने काम सुरू करण्यापूर्वीच वार्डातील विकास कामांना स्थगिती देण्यात आली.महोदय, तसेच ग्राम पंचायत सवणाचा सर्वात लहान वयाचा व अल्पसंख्याक समाजाचा एकमेव सदस्य असून इतर सदस्यांनी संगनमताने माझ्या वार्ड नं. ३ मध्ये विकास होऊ नये म्हणून व नागरिकांची गैरसोय व्हावी य त्यांना मुलभूत सुविधा मिळू नये याकरिता जाणून बुजून राजकिय व्देषा पोटी व माझी सामाजिक, राजकिय वजन व प्रतिमा मलिन करण्याच्या हेतुने सदरचे कृत्य केले आहे. तरी सदर प्रकरणाची आपले स्तरावरून चौकशी करून योग्य ती कार्यवाही करावी वार्डातील स्थगित करण्यात आलेली विकास कामे त्वरित सुरू करण्याबाबत ग्राम पंचायत सवणाचे पदाधिकारी व ग्रामसेवक यांना निर्देशित करण्यात यावे. करिता हे निवेदन. दीले या निवेदनात नमूद आहे

 

0 9 4 5 9 0
Users Today : 4
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *