चिखली–चिखली तालुक्यातील क्रीडा शिक्षकांची सहविचार सभा दि.4 ऑक्टोबर 2022रोजी महाराणा प्रताप विद्यालय,चिखली येथे सभागृहात संपन्न झाली. सदर सहविचार सभेचे अध्यक्ष विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक रमेश गडकर होते. व्यासपीठावर चिखली तालुका क्रीडा स्पर्धा संयोजक दिलिप लांडकर, माजी संयोजक प्रभाकर जाधव, सह संयोजक अमोल उरसाल, पांडव विद्यालय कव्हला येथील मुख्याध्यापक समाधान खेंते इत्यादी मान्यवर उपस्थित होते. सहविचार सभेपूर्वी हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तालुका क्रीडा संयोजक दिलिप लांडकर यांनी आपल्या प्रास्तविक भाषणातून सत्र2022-2023 मध्ये विद्यार्थ्यांच्या क्रीडास्पर्धा आयोजित करण्याबाबद, त्याच बरोबर दि.5 ऑक्टोबर ते दि.15 ऑक्टोबर या कालावधी मध्ये ऑनलाईन शाळेची नोंदणी, खेळाडूची नोंदणी,विविध प्रकारच्या खेळांची नोंदणी करून प्रवेशिका निश्चित करणे, त्याच बरोबर येत्या नोव्हेंबर महिन्यात आयोजित करण्यात येणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धा बाबद वेळापत्रक याबाबत सविस्तर माहिती दिली.यावेळी प्रभाकर जाधव, रमेश गडकर, समाधान खेंते यांनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी तालुक्यातील क्रीडा शिक्षक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. सदर सह विचार सभेचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन क्रीडा शिक्षक किसन पिसे यांनी केले.
Users Today : 39