छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ उत्साहात संपन्न प्रशासकीय सेवा एकाच छताखाली; नागरिकांच्या समस्यांचे तत्काळ निराकरण

KHOZ MASTER
1 Min Read

मेहकर

सामान्य नागरिकांच्या तक्रारींचे तात्काळ निवारण करून शासकीय योजनांचा लाभ थेट जनतेपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने हिवरा आश्रम येथे १० एप्रिल रोजी ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ उत्साहात पार पडले. या शिबिरातून शेकडो नागरिकांना विविध दाखले व सेवा जागेवरच उपलब्ध करून देण्यात आल्याने समाधानाचे वातावरण निर्माण झाले.

शिबिराच्या अध्यक्षस्थानी नायब तहसीलदार विजय पिंपरकर होते. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला अभिवादन करून करण्यात आली. उपविभागीय अधिकारी जोगी यांनी शिबिराला विशेष भेट दिली. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य संजय वडतकर, सरपंच मनोहर गिन्हे तसेच हिवरा आश्रम संस्थानचे उपाध्यक्ष अशोक थोरहाते उपस्थित होते.

या शिबिरात विविध विभागांचे स्वतंत्र कक्ष उभारण्यात आले होते. रेशन कार्ड, अन्न व नागरी पुरवठा, निराधार व वृद्धापकाळ योजना, उत्पन्न व जात दाखले, मोफत आरोग्य तपासणी, मृदा परीक्षण, शेतीविषयक मार्गदर्शन, जन्म-मृत्यू व विवाह नोंदणी अशा अनेक सेवांचा समावेश होता. लाभार्थ्यांना उत्पन्न दाखले, विवाह नोंदणी प्रमाणपत्रे, मृदा परीक्षण अहवाल तसेच विविध योजनांचे मंजुरी आदेश मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले.

मृदा परीक्षण अहवाल मिळाल्याने शेतकऱ्यांनी विशेष समाधान व्यक्त केले. कृषी, आरोग्य व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपल्या विभागातील योजनांची सविस्तर माहिती देत नागरिकांचे मार्गदर्शन केले.

शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी ग्राम महसूल अधिकारी शिवपाल राजपूत, सागर जायगुडे, परमेश्वर रहाटे, प्रविण गायकवाड, राहुल मोहिते यांच्यासह विविध विभागातील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

0 9 6 1 7 0
Users Today : 6
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *