४५७ वा नृसिंह नवरात्रोत्सव उत्साहात साजरा

KHOZ MASTER
1 Min Read

जगातील अकरापैकी सहावे अशी पौराणिक ख्याती असलेल्या मेहकरच्या ऐतिहासिक नरसिंह मंदिरामध्ये ४५७ वा नृसिंह नवरात्रोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. २ मे रोजी प्रक्षाळपूजा व गोतांबीलाच्या कार्यक्रमाने नवरात्रोत्सवाची सांगता झाली.
४५७ वर्षांची परंपरा लाभलेला हा उत्सव मेहकरच्या पंचक्रोशीतला सर्वात जुना उत्सव मानल्या जातो. नरसिंह संस्थानचे अध्यक्ष सद्गुरु ॲड.रंगनाथ महाराज पितळे यांच्याहस्ते ध्वजस्थापना होऊन या उत्सवाला प्रारंभ झाला. नृसिंह जयंतीच्या दिवशी शंतनु महाराज पाठक (सेलू) यांच्या कीर्तनानंतर नृसिंह जन्माचा अद्भुतरम्य सोहळा साजरा झाला. यावेळी दर्शनार्थींची प्रचंड गर्दी उसळली होती. जन्म सोहळ्यानंतर महाभिषेक व महाआरतीचा कार्यक्रम झाला. याप्रसंगी नृसिंह प्रतिष्ठानच्या वतीने हजारो भाविकांना फराळाचे वितरण करण्यात आले.
२२ एप्रिल ते २ मे या कालावधीत हरिपाठ, पारंपरिक उपासना, कीर्तन, भजन, काला, शेजारती, महाप्रसाद यांसह प्रथेनुसार अनेक कार्यक्रम साजरे झाले. चंद्रेश्वर भजनी मंडळाने काकडा भजनसेवा केली. दररोज संध्याकाळी श्रीमूर्तीला वेगवेगळ्या वारदेवतांच्या पोशाखाने सजविण्यात येत होते. या पोशाख दर्शनासाठी दररोज भाविक गर्दी करीत होते. नृसिंह जयंतीच्या दिवशी राज्यभरातून संत बाळाभाऊ महाराजांचा भक्तवर्ग एकवटला होता. या सर्वांची चोख व्यवस्था करण्यासाठी नरसिंह संस्थानचे विश्वस्त आशिष उमाळकर, डॉ.अभय कोठारी, विठ्ठल खंदारकर, श्रीरंग सावजी, विनोद डुरे पाटील आदींनी परिश्रम घेतले.

0 9 6 8 6 6
Users Today : 28
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *