महाराष्ट्र :
राज्य पोलीस प्रशासनात मोठे फेरबदल करण्यात आले असून वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. या बदलांमध्ये अहिल्यानगरच्या कर्तव्यदक्ष व डॅशिंग अधिकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या Tejaswi Satpute यांची पुणे शहर गुन्हे शाखेच्या अप्पर पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
या नियुक्तीमुळे पुणे शहरातील गुन्हेगारी नियंत्रण, तपास यंत्रणा आणि संवेदनशील प्रकरणांच्या तपास प्रक्रियेला अधिक गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सातपुते यांच्याकडे यापूर्वी अनेक महत्त्वाच्या तपासांची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडल्याचा अनुभव आहे.
विशेष म्हणजे राज्यात चर्चेत असलेल्या ‘खरात प्रकरणा’च्या विशेष तपास पथकाचा (SIT) तपासही त्यांच्या नेतृत्वाखालीच सुरू राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या तपासात सातत्य कायम राहणार असून, तपास प्रक्रियेत कोणताही बदल होणार नाही, असे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान, या नियुक्तीमुळे खरात प्रकरणातील तपासाला वेग आणि अधिक काटेकोर दिशा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच नव्या जबाबदारीनंतर सातपुते यांच्या नेतृत्वाखाली पुणे गुन्हे शाखेच्या कामकाजातही अधिक बळकटी येणार असल्याचे मानले जात आहे.
राज्य पोलीस दलातील या महत्त्वपूर्ण बदलांकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
Users Today : 8