ओस्लो
भारताचे पंतप्रधान Narendra Modi यांना नॉर्वे सरकारकडून देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘ग्रँड क्रॉस ऑफ द रॉयल नॉर्वेजियन ऑर्डर ऑफ मेरिट’ प्रदान करण्यात आला आहे. पंतप्रधान मोदींना मिळालेला हा ३२वा सर्वोच्च आंतरराष्ट्रीय सन्मान असून, जागतिक स्तरावर भारताचा वाढता प्रभाव आणि नेतृत्वाची दखल घेतल्याचे मानले जात आहे.
सोमवारी मोदी नॉर्वेची राजधानी Oslo येथे दाखल झाले. यावेळी ते तिसऱ्या भारत-नॉर्डिक शिखर परिषदेसह विविध द्विपक्षीय बैठकींमध्ये सहभागी होत आहेत. ओस्लो येथे आगमनानंतर नॉर्वे सरकारने विशेष समारंभात त्यांना हा प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान केला.
नॉर्वे सरकारच्या माहितीनुसार, ‘ग्रँड क्रॉस’ हा ‘रॉयल नॉर्वेजियन ऑर्डर ऑफ मेरिट’मधील सर्वोच्च दर्जाचा सन्मान आहे. विविध क्षेत्रांत असाधारण योगदान देणाऱ्या आणि आंतरराष्ट्रीय संबंध मजबूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या व्यक्तींनाच हा पुरस्कार दिला जातो.
या सन्मानामुळे भारत-नॉर्वे संबंधांना अधिक बळ मिळणार असल्याचे मानले जात आहे. ऊर्जा, हरित तंत्रज्ञान, समुद्री सहकार्य आणि हवामान बदल यांसारख्या क्षेत्रांत दोन्ही देशांमधील सहकार्य वाढवण्यावर चर्चाही अपेक्षित आहे.
Users Today : 28