कौसाबाई शेलार यांचे वृद्धापकाळाने निधन

Khozmaster
2 Min Read

पारनेर (प्रतिनिधी)शेलार मामा परिवाराचे मातृछत्र हरपले तालुक्यातील पोखरी येथील पवळदरा येथील रहिवासी असलेल्या कै. गं. भा. कौसाबाई महादू शेलार यांचे सोमवार दिनांक ३ अॉक्टोबर रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ९५ वर्षांच्या होत्या. पारनेर तालुक्यामध्ये एक शिस्तबध्द तसेच सामाजिक, धार्मिक कार्याची आवड असणारे आणि गोरगरीब आणि वंचित लोकांची सेवा करणारे व्यक्तिमत्व अशी त्यांची ख्याती होती. गेल्या पन्नास ते साठ वर्षांपासुन आजतायत या शेलार मामा परिवाराने कै. गं. भा. कौसाबाई शेलार यांच्या भरभक्कम पाठिंब्यावर शेतीबरोबरच वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मोठे यश संपादन केले आहे. आज दुर्मिळ झालेली एकत्र कुटुंबपध्दती शेलार मामा परिवाराने आजही जपुन ठेवली आहे या सर्व संस्कारांचे श्रेय मातोश्री कै. कौसाबाई शेलार यांना जाते. काळाची पावले ओळखत आणि समाजाप्रति असणारे आपले दायित्व लक्षात घेऊन स्व. कौसाबाई शेलार यांनी आपल्या परिवारातील मुलांना, नातवंडाना उच्चविभुषित केले. त्यातील काही डॉक्टर, इंजिनियर झाले. मातोश्री हॉस्पिटल, मातोश्री वीट सप्लायर्स, मातोश्री कलेक्शन, मातोश्री हुंडेकरी, स्व.तुळशीराम मामा शेलार संचलित मातोश्री उद्योग समुह अशा बहुअंगी व्यवसायामध्ये या परिवाराने मोठे यश मिळविले आणि ही सर्व स्थित्यंतरे कै. कौसाबाई शेलार यांनी पाहिली होती. त्यापाठीमागे त्या खंबीरपणे उभ्या राहिल्या होत्या. पारनेर ,संगमनेर तालुक्यामध्ये मोठा नावलौकिक असणाऱ्या आणि एक वर्षापूर्वी अल्पशा आजाराने निधन झालेल्या स्व. तुळशीराम मामा शेलार यांचा खूप मोठा आधार या कुटुंबाबरोबर अनेक जनसामान्य जनतेला होता. त्यांचाच सामाजिक, राजकीय व धार्मिक विचारांचा वारसा पुढे घेऊन जाणार्या पोखरी गावचे विद्यमान सरपंच श्री. परशुराम शेलार, संगमनेर येथील अकलापुरचे चेअरमन डॉ. बाबाजी शेलार तसेच प्रगतीशिल शेतकरी म्हणुन नावलौकिक असणारे श्री. सरसराम शेलार व श्री. बाळशिराम शेलार यांच्या त्या मातोश्री होत्या. त्याचबरोबर त्यांना दोन मुली अनुक्रमे सौ. लक्ष्मीबाई बाळु वाकळे व सौ. सुंदराबाई गणपत आभाळे तसेच पुतणे, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने पोखरी, अभाळवाडी, अकलापुर, पारनेर व संगमनेर तालुक्यामध्ये शोककळा पसरली आहे. त्यांचा दशक्रियाविधी बुधवार दिनांक १२ अॉक्टोबर रोजी सकाळी ७ : ३० वाजता पोखरी येथील पवळदरा येथील शेलारमामा निवास येथे होणार आहे. दशक्रियाविधीनिमित्त ह. भ. प. नंदु महाराज सोनवणे यांचे प्रवचन होणार आहे.

0 9 4 5 9 0
Users Today : 4
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *