प्रतिनीधी विशाल गवई अकोट अकोट तालुक्यातील लोहारी येथील अल्प भूधारक शेतकरी शेषराव सपकाळ यांनी त्यांच्या शेतात दसरा विजया दशमीच्या शुभ मुहर्तावर आपल्या शेतातील पहिल्या कापूस वेचणीच्या दिवशी महिलांचा साळी ,चोळी,बांगडी देवून सन्मान करून आपल्या शेतात एक आगळी वेगळी शितादही केली असून एक अल्पभूधारक शेतकरी यांनी एक वेगळी संकल्पना तयार केली त्यानुसार मजुरी करणाऱ्या महिलांचा कोठेतरी सन्मान व्हावा याकरिता त्यानी त्याच्या शेतातील पहिल्या कापूस वेचणीच्या दिवशी कापूस वेचणारया महिलांना आपल्या शेतात शितादही करण्याच्या वेळी साळी ,चोळी,बांगडी देवून सन्मान केला लोहारी येथील अल्पभूधारक शेतकरी शेषराव सपकाळ यांनी आपल्या शेतात दसरा विजयादशमी या शुभ मुहर्तावर आपल्या शेतात दही भाताचे बोन नवैद्य देवून पूजाअर्चा करून महिलाचा आदर करून त्यांचा साळी ,चोळी,बांगडी देवून सन्मान केला त्यानी गावचे सरपंच प्रदीप सपकाळ यांचा आदर्श घेतला असुन त्यानुसार यावरून आजच्या काळामध्ये सुद्धा मजुरांची कदर केल्या जात असल्याचे दिसून येत आहे त्याच्या शेतात काम करणाऱ्या प्रत्येक मजुरांचा ते आदरच करताना दिसत आहेत या अल्पभूधारक शेतकऱ्यानी बाकी शेतकऱ्यासमोर एक नवीन पायंडा घ्यावा असे सांगण्यात येते यासमोर शेतकऱ्यानी मजुरी करणाऱ्या मजुराचा सन्मान करावा असे यावरून दिसून येत आहे आजची परिस्थिती मजुरानसोबत सन्मानाने वागावे कारण मजुरी करणारे सेवटी माणूसच असल्याचे समजावे व बाकी शेतकऱ्यानी त्यांचा आदर्श घ्यावा असे सुध्दा दिसून येत आहे
मी एक अल्पभूधारक शेतकरी यांचा नातू आहे त्यामुळे मला परिस्थितीची जाणीव आहे त्यानुसार शेतात काम करणाऱ्या प्रतेक मजुराचा सन्मानच व्हावा त्यानुसार यावर्षी मी एक संकल्पना केली त्यानुसार मला माझ्या घरुन प्रतिसाद मिळाला व गावामध्ये पहिल्यांदाच कापूस वेचणाऱ्या महिलांना साळी,चोळी,बांगडी देवून त्यांचा सन्मान केला मी एक नवीन उपक्रम राबविला.त्याबद्दल मला खुप आनंद होत आहे
सुशील सपकाळ
नवीनच शेती कडे लक्ष देणारा आबाचा नातू
Users Today : 6