सांगली आरोग्य विषयक कार्यक्रमातून महापालिकेचे काम उल्लेखनीय असल्याने पत्र शासनाच्या आरोग्य सेवा विभागाकडून प्राप्त झाले आहे. ऑगस्ट अखेर महापालिका राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे. त्याबद्दल आरोग्य सेवा संचालक तुकाराम मुंढे यांनी महापालिका आयुक्त सुनील पवार यांना पत्र पाठवून कौतूक केले आहे.
सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका वतीने राज्य सरकार आरोग्य विभागकडून जाहीर करण्यात येणाऱ्या विविध आरोग्य विषयक योजना यामध्ये माता व बाल संगोपन , क्षयरोग तपासणी , कुष्ठरोग तपासणी आणि साथरोग तपासणी तसेच विविध आर्थिक लाभ देणाऱ्या योजनांच्या माध्यमातून लाभार्थ्यांना सहभाग यांसह विविध आरोग्य विषयक कार्यक्रम अंमलबजावणीचे आणि आरोग्य सेवा देणेचे काम आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे .
प्रत्येकवर्षी मार्च ते मार्च असा कामकाज अहवालपाहून संबंधित महापालिकेला नंबर दिला जातो . यावर्षीही आरोग्य सेवेत महापालिकेने पहिला क्रमांक घ्यावा यासाठी मनपा आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत खोसे , उपायुक्त राहूल रोकडे, चंद्रकांत आडके यांच्या सूचनेनुसार आरोग्याधिकारी डॉ. सुनील आंबोळे, डॉ. रवींद्र ताटे आणि नोडल ऑफिसर डॉ वैभव पाटील यांच्यासह राष्ट्रीय शहरी अभियान आरसीएच वैद्यकीय अधिकारी व सर्व नर्सेस , आशा वर्कर , क्षयरोग कर्मचारी टीम आरोग्य सेवेमध्ये उत्तम कामगिरी करत आहे.
यामध्ये गर्भवती महिलांची तपासणी , काळजी ते प्रस्तुती व बालक लसीकरण व पुरुष तसेच महिला नसबंदीपर्यंत कार्यक्राम राबविला जातो. या कामगिरीचा ऑगस्ट अखेरचा अहवाल शासनाकडून मनपाला प्राप्त झाला आहे. यामध्ये शासनाच्या विविध योजना राबविणे तसेच आरोग्य सेवा पुरविण्याचे महानगरपालिका प्रथम क्रमांकावर आल्याचे कळविण्यात आले. आरोग्य सेवा संचालक तुकाराम मुंढे यांनी मनपा आयुक्त सुनील पवार यांना पत्र पाठवून कौतुक केले .
Users Today : 27