प्रतिनीधी रवि मगर_- मौजे मंडपगाव येथे पिढीत जखमी साक्षीदार तरबेज पठाण ,सादिक पठाण यांच्यावर 307 मधील आरोपी इसम रफिक अजमत पठाण,376 बलात्कार पोस्को मधील आरोपी समीर अजमत पठाण,तसेच त्याचा वडील अजमत पठाण व सय्यद जाकेर यांनी सुमारे रात्री 11,11:45 वाजता जीव घेणा हल्ला करत आमच्यावरील 307 केस मिटव नाही तर तुला आणि तुझ्या भावाला मारून टाकू,आमच्या विरुद्ध कोर्टात साक्ष देऊ नको असे म्हणत हल्ला केला,यामध्ये सादिक अली पठाण याला डोक्यावर जबर दुखापत झाली असून 5,ते 6 टाके लागले आहे,यामध्ये तरबेज यांच्या छातीवर कमरेवर जबर मार लागले आहे. हकीकत अशी की ,तरबेज पठाण, सादिक पठाण यांच्यावर 2014 मध्ये धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केल्या प्रकरणी आरोपी रफिक अजमत पठाण यावर भारतीय दंड संहिता अप.क्र.48/2014,हाफ मर्डर,307,506,504,143,146,148,149 गुन्हे दाखल आहे,सदर केस ही आपसात मिटून घे अन्यथा आम्ही तुला जीवे मारू अश्या धमक्या रफिक अजमत पठाण,समीर अजमत पठाण,अजमत महेबूब पठाण हे तीन इसम पिढीत जखमी साक्षीदार तरबेज पठाण यांना देत होते,सदर केस ही बोर्डावर आली असून तरबेज हबीब पठाण यांना बुलढाणा न्यायालयाने साक्ष देण्यासाठी 15.10.2022 रोजी साक्ष समन्स काढले होते,परन्तु साक्षीदार तरबेज पठाण ,सादिक पठाण यांना साक्ष साठी कोर्टा पर्यंत पोहचू देणार नाही या हेतूने दि.04/10/2022 रोजी 11 ते 11:45 दर्मियान 307 चे आरोपी रफिक अजमत पठाण व त्याचा भाऊ पोस्को 376 बलात्कार मधील आरोपी समीर अजमत पठाण, अजमत पठाण,सय्यद जाकेर सय्यद सैदान यांनी तरबेज पठाण व त्यांचा भाऊ सादिक पठाण यांच्यावर जीवघेणा हल्ला केला.यामध्ये सादिक पठाण यांना गंभीर दुखावत झाली, सदर प्रकरणी अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हे दाखल झाले आहे.
Users Today : 10