मेहकर दि.7 सप्टेंबर 2022 रोजी मेहकर मधील प्रसिद्ध कृषी वैभव लॉन येथे एकदिवसीय फोटोग्राफी कार्यशाळा यशस्वीपणे संपन्न झाली.सर्वप्रथम रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या फोटोचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुजन व दिपप्रज्वलन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले त्या नंतर प्रमुख मार्गदर्शक व प्रमुख पाहुणे यांचे आयोजकांनी शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेले मार्गदर्शक विकास इंगळे सर (मुंबई) होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये गणेश घरत सर (अध्यक्ष ऑल महाराष्ट्र फोटोग्राफर असोसिएशनचे, महाराष्ट्र राज्य),डिगांंबर बापु जाधव (जिल्हाध्यक्ष ऑल म.फो.अ.),मिलिंद कीर्तिकर-फोटो फेस अलबम (संभाजीनगर-औ.बाद) हे होते तर उत्कृष्ट अश्या कार्यक्रमाचे प्रमुख आयोजन कैलास सरडे सर,अविनाश कावरखे सर, विठ्ठल घारोड सर,रामेश्वर घटमळ सर, गणेश कांबळे सर व समाधान पदमणे सर यांनी केले होते.तसेच आयोजकांचा या एकदिवसीय कार्यशाळेचा मुख्य उद्देश होता की,आजची फोटोग्राफर ची वस्तूस्थिती अशी झाली की महागडे कॅमेरे, त्यावर इतर भांडवलावर लाखो रु खर्च ,मजुरदार,रात्रीबेरात्री जाणे येणे,झोप बाजुला ठेवून वेळेवर पोहचणे,पार्टीचा कोणताही कार्यक्रम वगळणार नाही याची काळजी घेणे,वेळ प्रसंगी पार्टीचे बोलणे(शिव्या) खाणे,कधी काळी पार्टी शिव्या घालतील त्या भीतीने स्वतःचा जीव धोक्यात घालून वेळेवर पोहचणे म्हणून वाहने जोरात चालविणे अश्या असंख्य गोष्टींचा विचार लक्षात घेऊन आयोजकांनी गावाकडील फोटोग्राफर ला फायदा कसा करून देता येईल.त्या उद्देशाने हा एकदिवसीय फोटोग्राफर कार्यशाळा घेण्याचा चांगला निर्णय घेतला.गावाकडील फोटोग्राफर बांधव यांना नवीन नवीन टिप्स व फोटोग्राफी कशी केली पाहिजेत त्याचे ज्ञान व माहिती असणे गरजेचे असते त्यावर व्यवसाय अवलंबून असतो.अश्या वेळी गावाकडील फोटोग्राफर बांधव बाहेरगावी मोठ्या शहरात प्रशिक्षण घेण्यासाठी राहणे,जेवण,भाडे,वेळ,पैैसा या सर्व गोष्टी करण्यास परवडत नसल्याने जाऊ शकत नाहीत म्हणून अनेक फोटोग्राफर हे व्यवसायात यशस्वी होऊ शकत नाही.त्यातच पार्टी वेळेवर पैसा देत नाही दिला तर कधी काळी कमी देतात तर कार्यक्रमाचा डेटा करप होतो,कधी काळी ऍडव्हान्स कमी घेतल्या जाऊनही पार्टी डेटा नेत नाही.त्यातच मोबाईल मुळे फोटोग्राफी वर झालेला परिणाम.अश्या वेळी त्या फोटोग्राफर ला मजुरी व इतर खर्च वजा हिशोब केला तर फोटोग्राफर हा नफा कमवायच्या ठिकाणी तोटा भोगत असतो त्यामुळे फोटोग्राफी बंद पडते किंवा तो फोटोग्राफर बांधव महागडे कॅमेरे घेऊन कर्जबाजारी होतो नंतर त्याला अतिप्रसंनाला व अनेक वेगवेगळ्या संकटाना सामोरे जावे लागते.म्हणून आजचा फोटोग्राफर बांधव हा सर्व गोष्टी परिपूर्ण असला पाहिजे जेणेकरून त्यावर कोणतीही वाईट परिस्थिती निर्माण झाली नाही पाहिजे कोणावरही अतिप्रसंगाला सामोरे जाण्यास भाग पडू नये. म्हणून मेहकर व लोणार तालुक्यासह इतरांना त्याचा फायदा व्हावा यासाठी आयोजकांंनी हा एकदिवसीय फोटोग्राफी कार्यशाळेचे अतिशय चांगले आयोजन केले.होते मध्ये जेवण व चाय ची व्यवस्था करण्यात आली होती.या कार्यशाळेचा फायदा मेहकर, लोणार,रिसोड,चिखली,बुलढाणा, सिंदखेडराजा, वाशिम येथील दूरदूरच्या फोटोग्राफर बांधवांनी मोठया संख्येने घेतला व उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रशांत गावंडे सरांनी केले तर आभार प्रदर्शन कैलास सरडे सरांनी मानले व कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व फोटोग्राफर बांधवांनी मेहनत व परिश्रम घेतले.
Users Today : 10