जोरदार पावसाने शेतामधील पिकांचे नुकसान..!!

Khozmaster
1 Min Read

शेतकरी हवालदिल, सरसकट आर्थिक मदत द्यावी, शेतकऱ्याची मागणी..

दिपक मापारी, रिसोड

पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी तुंबले असून, सोयाबीन पिकाचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना गतवर्षीच्या प्रलंबित अनुदानासह या वर्षाचेही आर्थिक सहाय्य करून शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी, अशी मागणी संकटात सापडलेल्या शेतकरी वर्ग करीत आहे..

घोटा ,चिखली, तथा लगतच्या शेत शिवारात झालेल्या जोरदार पावसाने शेत जमिनीत पाणी साचले असून सोयाबीनच्या पिकाला जब्बर फटका बसला आहे. नदी नाल्यांना पाणी वाहत असून जमिनीने पाणी धरले आहे. अति पावसाने शेंगा गळत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास निसर्ग तीन वर्षापासून विसकत आहे. गतवर्षीचा शासनाने जाहीर केलेला अतिवृष्टी बाधित निधीची अजूनही फुटी कवडी सुद्धा शेतकऱ्यांना मिळाली नाहीतर पिक विमा कंपनीनेही शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणेच पुसली आहे. यावर्षी तर जुलैपासून संततधार पाऊस सुरू आहे. शेतीला दर वर्षापेक्षा तिप्पट खर्च शेतकऱ्यांना लागत आहे. आणि सोयाबीन पिकाची स्थिती चिंताजनक आहे..

वन्य प्राण्यांचा त्रास डुकराचा,हैदोस,रोहणाचा, उभ्या पिकात धिंगाणा, माकडाने पिकाची केलेली नासाडी त्यात निसर्गाचा सततचा अतिवृष्टीचा मार शेतकऱ्यांच्या निराशाचे कारण बनला आहे..

शेतकऱ्याचे कैवारी असल्याचे सरकार सांगत आहे तेव्हा शासनाने शेतकऱ्यांना गतवर्षीचा अतिवृष्टी बाधित मंजूर निधी व यावर्षी सुद्धा झालेल्या जोरदार पावसाची नुकसान भरपाई अनुदानाने सरसकट दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना द्यावी अशी मागणी घोटा,चिखली, कवठा सर्कल मधील शेतकरी वर्गातर्फे केली जात आहे..

0 9 4 5 9 7
Users Today : 11
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *