पद्मभूषण डॉ विजय भटकर हे एक जागतिक किर्ती प्राप्त करून देशवैभवात भर टाकणारे कार्यसिद्ध व्यक्तीमत्व.आंतरराष्ट्रीय किर्तीचे अनेक मानसन्मान , पुरस्कार मिळविलेल्या आणि ज्यांना जागतिक स्तरावरील मातब्बर मंडळी नुसती ओळखतच नाही तर खूप सन्मानाने आदर करतात व मोठमोठ्या जबाबदाऱ्या पार पाडायला सांगतात , अशा किर्तीवान , प्रतिभाशाली , ज्ञानसंपन्न वैज्ञानिकाचा अमृतमहोत्सवी वर्षापर्यंत गेल्या सहावर्षांपासून जन्मदिवस सातत्याने विधायक उपक्रमांद्वारे माझ्या संकल्पनेतून दर्यापूरच्या गाडगेबाबा मंडळाला साजरा करता आला हे आम्हा सर्व आयोजक मंडळीचे मी भाग्य समजतो.संगणक क्षेत्रात भारताची मान उंचावणा-या संगणकतज्ञ डॉ विजय पांडूरंग भटकर यांचा जन्म दि११ आँक्टोबर १९४६ रोजी अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर तालुक्याच्या मुंरंबा या छोट्या खेडे गावी झाला.वडील भाऊसाहेब भटकर स्वातंत्र सेनानी व आई निर्मलाताई शिक्षीका. मुलांच्या संगोपणाची सर्वस्वी जबाबदारी नोकरी सोडून आईने स्विकारली. मुर्तिजापूर येथे शिक्षण घेत असलेल्या काळात संत गाडगेबाबांची वारंवार प्रत्यक्ष भेट होत असल्याने त्यांच्या कार्याची व विचारांची तथा पर्यायाने मानवता धर्माची पकड जी मनावर बसली ती आजवर सुद्धा कायम असल्याचे जानवते. भारतीय स्वातंत्र्य लढयातील आपल्या वडिलांच्या संस्कारामुळेच हा माणूस सामान्यात राहून असामान्य झाला .शिक्षण घेत असतांना प्रत्येक बाबतीत आईची परवानगी घेण्याचे व्रत त्यांनी आयुष्यभर पाळले. कोणतेही चांगले वाईट कृत्य करतांना स्वतःच्या अंतर्मनाचा विचार घेऊन त्यानुसार वागावे हा आईने दिलेला आदेश ते सिद्धांत म्हणून वापरतात. संशोधन हा शिक्षणातील सर्वोच्च क्षण प्रत्येक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी साधावा असे कळकळीचे आवाहन ते सतत करीत असतात. सर्वविषय संपन्न एकत्रित शिक्षण पध्दती याकडे ते वारंवार सर्वांचे लक्ष केंद्रीत करतांना आढळतात.अध्यात्म व विज्ञान या संगमाचा पाया माझ्या आजीने घालून दिल्याचा उल्लेख डॉ भटकर नेहमी करतात. वाचन , संशोधन , स्वच्छता , त्याग या दुर्मिळ सामुग्रीचा वर्षाव करणाऱ्या आजी शांताबाई कृष्णाजी चौधरी यांना सर्वजण माय म्हणून आदराने संबोधित करीत असल्याची भावपूर्ण आठवण त्यांच्या ओठावर तरवळतांना दिसते . उच्च शिक्षण इलेक्ट्रीकल या अभियांत्रिकी विषयांत असून सुद्धा इलेक्ट्रानिक्स व कॉम्प्युटर या विषयात सुद्धा त्याच तोलामोलाचे ज्ञान असणे ही सामान्य बाब असू शकत नाही. भारतीय पहील्या संगणकाचे जनक म्हणून त्यांनी ते सिद्ध ही करून दाखविले आहे. युवकांनी वारंवार अभ्यासावा असा हा सजीव ग्रंथ डॉ विजय भटकर आपल्याला उपलब्ध आहेत. मार्गदर्शनाचा हा पांढरा शुभ्र झरा सर्वांना मोहीत करणारा ठरला असून देशातील विविध मोठी जबाबदारीची पदे सांभाळून स्वजीवन उपकृत करीत आहे. युवकांनी हा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जीवन घडविण्याची ही सुवर्ण संधी ठरू शकते. घार हिंडते आकाशी परी लक्ष पिलापाशी या उक्ती प्रमाणे आयुष्यभर व वर्षभर सतत जन्मगाव मुरंबा येथे भेट देवून ग्रामाणी जीवनात रमणारा हा शास्त्रज्ञ काहीसा वेगळाच .भारत हा जगातील एक समृद्ध व संपन्न राष्ट्र म्हणून पुढे यावा असे डॉ विजय भटकर यांचे स्वप्न असून त्यांच्या परीने ते यासाठी प्रयत्न करतांना जाणवतात . आय.टी. क्षेत्रात उत्कृष्ट विद्यार्थी तयार झाले तर हे सहज शक्य असल्याचे ते सांगतात. असे झाल्यास भारत हा देश विज्ञान व अध्यात्मिक ज्ञानात अग्रणी असेल असे त्यांचे भाकीत आहे. मी जर यावेळी या पृथ्वीवर नसलो तरी येणाऱ्या युवा पिढीने असा सुसंस्कृत प्रगत भारत देश पहावा असे विलोभनीय देश प्रेमाणे वेडा असलेला हा ऋषी आपल्या देशाची सार्वजनिक संपत्ती ठरतो . संगणक क्षेत्रात त्यांच्या एवढ्या ज्ञानाची बरोबरी जरी आपण करु शकलो नाही तरी एखाद्या संगणक हाताळून ज्ञान प्राप्ती साठी , संशोधक कार्यासाठी निदान प्रयत्न जरी केले तरी ती पद्मभूषण डॉ विजय भटकर यांना जन्मदिनाची भेट ठरेल .उन्नत भारत अभियान या देशव्यापी अभियानांतर्गत उपक्रमाचे राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने कार्य करीत असतांना देशातील अनेक खेडेगावाना विकसीत करून आदर्श ग्राम निर्मितीचे महत्वपूर्ण व पवित्र कार्य त्यांनी केलेले आहे व करीत आहेत. बिहार मधील नालंदा या विश्वविद्यापिठाचे कुलपती म्हणून कार्यरत असलेले डॉ भटकर हे देशातील अनेक विद्यापीठांचे कुलगुरु म्हणूनही कार्यरत होते व आहेत सुद्धा. विज्ञान भारती या राष्ट्रीय संघटनेचे अध्यक्ष म्हणून सुध्दा सरांची कामगिरी अलौकीक आहे. अश्या सर्वांगीण क्षेत्रात मुक्तपणे मार्गदर्शनाचा तथा कार्याचा संचार करणाऱ्या मान्यवरांवर किती लिहावे ?उन्नत भारत अभियान या देशव्यापी अभियानांतर्गत उपक्रमाचे राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने कार्य करीत असतांना देशातील अनेक खेडेगावाना विकसीत करून आदर्श ग्राम निर्मितीचे महत्वपूर्ण व पवित्र कार्य त्यांनी केलेले आहे व करीत आहेत. बिहार मधील नालंदा या विश्वविद्यापिठाचे कुलपती म्हणून कार्यरत असलेले डॉ भटकर हे देशातील अनेक विद्यापीठांचे कुलगुरु म्हणूनही कार्यरत होते व आहेत सुद्धा. विज्ञान भारती या राष्ट्रीय संघटनेचे अध्यक्ष म्हणून सुध्दा सरांची कामगिरी अलौकीक आहे. अश्या सर्वांगीण क्षेत्रात मुक्तपणे मार्गदर्शनाचा तथा कार्याचा संचार करणाऱ्या मान्यवरांवर किती लिहावे ?ग्रामीण विकासाचा मंत्रोच्चारी या तपस्वी ऋषीला सर्व देशबांधवांच्या वतीने आज ११ ऑक्टोबर या दिवशी जन्मदिनाच्या कोटी कोटी मनःपूर्वक शुभेच्छा व अभिनंदन.
प्रा गजानन भारसाकळे, अध्यक्ष – गाडगेबाबा मंडळ , दर्यापूर