काळाच्या पडद्याड
यादवजी मुलायम
पोरके करे जनाला
का निष्ठूर होई यम
यु पी राजकारणात
ठसा ठसला कायम
पोकळी राहे तशीचं
वाटे उणीव हरदम
मुख्यमंत्री पदा वरी
कालखंड कार्यक्षम
संरक्षण धुरा वाहता
निर्णय ठाम सक्षम
किसाननेता हाडाचे
कृषि सफल दृश्यम
पुरोगामी विचारांती
रे दूर दर्शिता पश्यम्
विवाद ग्रस्त वक्तव्य
निर्माण कधी संभ्रम
मंडल आयोग लढा
प्रकाशा येई एकदम
नाव जसे मुलायम
स्वभाव तसा नरम
आयुष्यभर ते जपले
रे समाजवादी करम
— हेमंत मुसरीफ पुणे.
9730306996.
www.kavyakusum.com
Users Today : 11