विनोद वसु अकोट तालुका प्रतिनिधी*
महिला आर्थिक विकास महामंडल ,अकोला अंतर्गत स्थापित लोक संचलित साधन केंद्र अकोट ९ वी वार्षिक सर्व साधारण सभा दि.२७ ऑगस्ट रोजी (AGM) CMRC च्या अध्यक्ष सौ. मंदाताई अकर्ते यांच्या आदेशानुसार घेण्यात आली. सभेला प्रमुख पाहुणे म्हणुन विभागीय अधिकारी HDFC Bank देवानंद मोरे तसेच अकोला जिल्हा कार्यालय च्या सहाय्यक जिल्हा समन्वय अधिकारी त्रिशुला घ्यार व लोक संचलित साधन केंद्राचे केंद्र व्यवस्थापक अमर सुभाष इंगळे, लेखापाल मनीष बोरोडे, कार्यकारणी सदस्य व CMRC चा पूर्ण स्टाफ व CMRC मधील कार्यरत गावातील महिला उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्र संचालन अमर इंगळे यांनी केले. तसेच CMRC च्या माजी अध्यक्ष सौ.आरतीताई गायकवाड यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे आराध्यदैवत सावित्रीबाई फुले यांच्या फोटो चे पूजन करण्यात आले.सहयोगीनी व प्रेरक यांनी मागील वर्षात चांगले काम केल्यामुळे सहयोगीनीला व प्रेरक यांना बक्षीस व प्रमाणतपत्र देऊन गोरवण्यात आले.CMRC व्यवस्थापक यांनी मागील वर्षभरात झालेल्या कामकाजाचे मांडणी केले, त्यांनतर चालू वर्षात ठरलेला करावयाचा कामाचा अजेंडा सादर केले.त्या नंतर जिल्हाचे सहाय्यक जिल्हा समन्वय अधिकारी यांनी महिलांना नव तेजस्विनी योजना, सब प्रोजेक्ट , तेजश्री योजना व इतर योजना बदल मोठ्या प्रमाणात उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. नंतर विभागीय अधिकारी HDFC Bank देवानंद मोरे यांनी बँक पॉलिसी, कर्ज वितरण व इतर बँक योजना विषयी माहिती दिली व मार्गदर्शन केले.त्या नंतर शहानूर येथील बचत गटातील महिलांनी पारंपारिक नृत्य सादर केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी CMRC च्या कामाची रूपरेषा सांगितली व CMRC चा सेवा विषयी मार्गदर्शन केले. व त्या नंतर त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यानंतर उपस्थित महिला पैकी काही महिलांनी बचत गटाचे गीत,भीम गीत , सावित्रीबाई फुले तसेच राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांचे भाषण केले. त्यानंतर बचत गटातील महिलेच्या मुलीने डान्स केला. शेवटी CMRC च्या सचिव सौ. उज्वला मोहोड यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले.
Users Today : 21