संत निरंकारी मिशन द्वारा आयोजित रक्तदान शिबिरात 237रक्तदात्यांनी रक्तदान केले …

Khozmaster
4 Min Read

चिखली;-संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन ट्रस्ट (दिल्ली) अंतर्गत येणाऱ्या संत निरंकारी मंडळ शाखा चिखली जिल्हा बुलडाणा च्या वतीने दिनांक 28.08.2022 वार रविवार ला संत निरंकारी सत्संग भवन शेलूद खामगाव रोड चिखली जिल्हा बुलडाणा येथे महा रक्तदान शिबीर मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या शिबिरात 237 रक्तदात्यांनी रक्तदान केले. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन सकाळी 9.00 वाजता हिरकणी महिला अर्बन च्या अध्यक्षा सौ. वृषाली ताई बोंद्रे, चिखली तहसील चे नायब तहसीलदार श्री संजय टाके साहेब , अध्यक्ष वाशीम जिल्हा पत्रकार संघाचे माधवराव अंभोरे हेडगेवार रुग्णालय चिखली चे डॉ. आशुतोष गुप्ता,शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रेम राज भाला,प्रा.निलेश गावंडे , संत निरंकारी मंडळाचे जिल्हा संयोजक शाली कराम चवरे गुरुजी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विजय कोठारी अंबिकाअर्बन संचालक ,प्रभाकर मंगळकर सरकारी वकील, जनार्दन बोरकर सर प्रचारक संत निरंकारी मंडळ वाशीम दत्ता जी बंडेवार सेवादल संचालक वाशीम,जयसिंग बोरुडे मुखी ता.पारनेर जिल्हा अहमदनगर, हर्षद म्हस्के सेवादल संचालक पुणेवाडी संतोष रेपाळे पुणे वाडी कैलास भालेकर उद्योजक महालक्ष्मी समूह,ज्ञानेश्वर मोरे माजी सरपंच शेलूद केशव सदार यांची प्रमुख उपस्थिती होती. या शिबिराला देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य यांचे सचिव तथा लोकप्रिय आमदार श्वेताताई महाले पाटील यांचे पती विद्याधर महाले, माजी आमदार राहुल बोंद्रे, चिखली चे तहसीलदार डॉ.अजित कुमार येळे, देऊळगाव राजा चे तहसीलदार शाम धनमने,माजी जिल्हा.परिषद अध्यक्ष नरेंद्र खेडेकर, कुणाल बोंद्रे, अनिस भाई, कृष्ण कुमार सपकाळ शिवराज पाटील दत्ता सुसर डॉ.प्रकाश शिंगणे सुभाष आप्पा मंगरूळकर संजय चेके,सुधीर चेके (पत्रकार) यांनी भेटी दिल्या यावेळी आलेल्या मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी प्रास्ताविक पर बोलताना चवरे महाराज यांनी सांगितले की संत निरंकारी मंडळाची जगात सर्वात मोठी रक्तपेढी आहे. व मिशन अनेक सामाजिक उपक्रमात सहभाग घेत असते. मंडळा चि इत्यंभूत माहिती दिली. त्यानंतर श्री विद्याधर महाले यांनी बोलताना सांगितले की मंडळाचे सामाजिक व राष्ट्रीय कार्य खूप मोठे आहे व मंडळाला कोणती ही सामाजिक मदत लागली तर मी शासनाच्या मदतीने व आमदार निधी तून पूर्ण करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करीन असे आश्वासन दिले. तद्नंतर राहुल बोंद्रे यांनी सांगितले की मी नेहमी मंडळा च्या कार्यात सहभागी होत असतो मला नेहमी येथे आल्या नंतर आत्मिक समाधान प्राप्त होत असते. माधवराव जी अंभोरे यांनी सांगितले की चिखली ब्रँच तर्फे नेहमी सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात व आज सुद्धा महा रक्तदान शिबिराचे आयोजन. मोठ्या प्रमाणात केल्या गेले नेहमी आम्हांला चिखली कडून प्रेरणा मिळत राहते.नंतर डॉ. आशुतोष गुप्ता यांनी सांगितले की रक्तदान करण्याची सामान्य माणसाच्या मनात खूप भीती असते. परंतु घाबरून न जाता प्रत्त्येक व्यक्ति ने रक्तदान करायला पाहिजे. व शेवटी अध्यक्षस्थानी असलेल्या बोंद्रे ताई यांनी सांगितले की संत निरंकारी मंडळाची मी जुनी सदस्य आहे व मंडळ

सेवा कार्यात तसेच राष्ट्रीय कार्यात नेहमी अग्रेसर असते.रक्तदान शिबिरात माजी आमदार राहुल बोंद्रे व तहसीलदार शाम धनमने यांच्या सह 237 जणांनी मोठ्या उत्साहाने रक्तदान केले. सायंकाळी 5.00 ते 8.00 या वेळेत विशाल सत्संग सोहळा जनार्दन जी बोरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला मानवाने मिळालेल्या मनुष्य जन्माचे सार्थक सद्गुरु द्वारा मिळालेल्या ब्रम्हज्ञान अंगीकार करून करायला पाहिजे नेहमी सत्संग करायला पाहिजे. विशाल सत्संग चा लाभ शेकडो भक्तांनी घेतला. कार्यक्रमा च्या यशस्वी ते साठी जिल्हा संयोजक चवरे गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली सेवादल संचालक संतोष गाडे द्वारका काळे व दिपक इंगळे अशोक आयलानी व संपूर्ण सेवादला नी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष राजपूत व आभार प्रदर्शन विनोद चव्हाण यांनी मानले.

0 8 9 4 5 5
Users Today : 21
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *