कोल्हापूर येथे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समितीच्या वतीने केला आई व वडीलांचा सत्कार

Khozmaster
2 Min Read

प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत कोल्हापूर येथे आज दि.11/10/22 रोजी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप बाबा खंडापूरकर लातूर यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती कोल्हापूर वतीने विभागीय अध्यक्ष मा.धनंजय सराटे यांनी एक आगळा वेगळा कार्यक्रम घेऊन आई-वडिलांचा सत्कार असा आगळावेगळा कार्यक्रम आयोजित केला होता तसेच माऊली महिला ग्रह उद्योग समूहाचे उद्घाटन सोहळा तसेच गुणगौरव सोहळा तसेच घरगुती गणपती सजावटीचे बक्षीस वितरण सोहळा संपन् झाला. यावेळी प्रमुख पाहुणे मा.सुजीतभाऊ चव्हाण, मा.प्रविण काकडे,सौ.शोभाताई बल्लाळ, डॉ. सुरेश राठोड, मा.राजेश भोसले, मा.गजानन कोले,मा.अविनाश पाटील, मा.सागर शिपेकर,मा.वसंतराव लिंगनूरकर,मा.दिगंबर तोरस्कर,मा.बी.व्ही. शिंदे,याचां पण ठिकाणी शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.तसेच समाजिक कार्यात सदैव तत्पर असणारे अष्टपैलू व्यक्तीमत्वांचा याचां महेश घोरपडे,नौशाद शेख,सुरेश अतिग्रे,सौ.मेघा भोसले, चेतन गायकवाड, डॉ. अजित येलपले,मा.प्रकाश पाटील, सचिन शिंदे यांचा अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे वतीनी सत्कार करण्यात आला.मा.समीर जमादार प्रदेश अध्यक्ष,सौ.पूजा शिंदे महिला जिल्हा अध्यक्ष ,सौ.बागे मॅडम उपजिल्हा अध्यक्ष ,मा.संजय कात्रट जिल्हाअध्यक्ष यांनी याप्रसंगी सर्व मान्यवरांचा सत्कार केला. यावेळी मा. सुजित भाऊ चव्हाण ( शिवसेना जिल्हाध्यक्ष), मा. प्रवीणजी काकडे साहेब( ऑल इंडिया धनगर समाज महासंघ प्रदेशाध्यक्ष )सौ. शोभाताई बल्लाळ ( राष्ट्रीय उपाध्यक्ष),मा.अविनाश पाटील,मा.राजेश भोसले (पोलीस मित्र दक्ष नागरिक ),मा.डॉ.सुरेश राठोड,मा.गजानन कोल्हे,मा.डॉ.बाबुराव घुरके,मा. धनंजय सराटे साहेब ( विभागीय अध्यक्ष)व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.अशी माहिती जिल्हा अध्यक्ष संजय कात्रट यांनी दै.खोजमास्तर न्यूजचे औरंगाबाद गोकुळसिंग राजपूत याच्याशी बोलताना सांगितले.

 

0 9 4 5 9 7
Users Today : 11
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *