विष्णुपंत भुतेकर. संस्थापक अध्यक्ष भूमिपुत्र शेतकरी संघटना._ सोयाबीन उत्पादक शेतकर्यांचे काढणीला आलेल्या सोयाबीन पीकाचे रोज होणार्या पावसाने प्रचंड नुकसान होत आहे. सत्तर टक्के पीक शेतात आहे. रोज पडणारा पाऊस, मजुर टंचाई यामुळे उभ्या आणि काढणीस आलेल्या सोयाबीनला कोंब फुटत आहेत. तर आडव्या पाडलेल्या सोयाबीन सडुन जात आहेत. आनेक शेतकर्यांनी पावसाच्या भितीने हिरव्या, कच्या सोयाबीनच्या कापून गंज्या घातल्या आहेत त्याही आता कुजण्याच्या आवस्थेत आहेत. रोज धो-धो पडणार्या पावसामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांवर प्रचंड संकट ओढावले आहे. वर्षभराचा अर्थिक व्यवहार सोयाबीन पीकावरच अवलंबून आहे. आशा कठीण परिस्थितीत शासनाने शेतकर्यांच्या पाठीसी उभे राहून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट मदत केली पाहिजे. आसी मागणी भूमिपुत्र शेतकरी संघटनेकडून राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथराव शिंदे आणि उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राव्दारे केली आसल्याचे विष्णुपंत भुतेकर यांनी सांगीतले. ज्या ज्या शेतकऱ्यांनी खरीपातील पीक विमा घेतला आसेल त्यांना विमाक॔पनी कडुन मदत झाली पाहिजे. सरकारने अतिवृष्टीतुन वगळलेल्या सर्व मंडळाचा समावेश करून दिवाळीच्या आधी सोयाबीन उत्पादक शेतकर्यांना मदत केली पाहिजे. गोदामात सडत पडलेली दाळ, साखर, पामतेल, आळया झालेला रवा शंभर रूपायात दिल्या पेक्षा शासनाने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी मदत दिवाळीत दिली पाहिजे आशी मागणी भूमिपुत्र कडुन करण्यात आली आहे.
Users Today : 11