नायगाव बु: निवडणुका म्हटले की नेत्यांकडून आश्वासने देण्याचा हंगाम असतो. आतापर्यंत इतर अनेक लोकप्रतिनिधींनी नायगाव येथील तुळजा भवानी मंदिरासमोरील ग्राम पंचायतीच्या जागेवर सभामंडप देण्याचे आश्वासन दिले . इतर नेत्यांनी या ठिकाणी सभामंडपाचे एकदा नव्हे अनेकदा आश्वासने देऊनही आश्र्वासन पूर्तता केली नाही . परंतू आ सौ श्वेता ताई महाले पाटील यांनी मागील विधान सभेत दिलेले आश्वासन सभामंडपाचे काम सुरू करून दिलेला शब्द पुर्ण केल्याचे प्रतिपादन आश्रुबा चिंचोले यानी नायगाव येथील तुळजा भवानी मंदिरासमोरील ग्राम पंचायतीच्या जागेवरील आ सौ श्वेता ताई महाले पाटील यांच्या आमदार निधी मधून मंजूर पाच लक्ष रुपये किमतीच्या सभामंडप कामाच्या भूमिपूजन प्रसंगी केले.
नायगाव बु येथील गावकरी मंडळी व चर्मकार समाज बांधवांनी विधानसभा निवडुकीच्या काळात सभामंडप कामाची मागणी केली होती. ताईंनी शब्द दिला होता समाज बांधवांनी माझ्या पाठीशी ताकदीनिशी उभे रहावे .मी दिलेला शब्द पूर्ण करीन समाज बांधव हा विधानसभा निवडणूकीत पूर्ण पने ताईच्या पाठीशी होता . आज त्या शब्दाची पूर्तता भूमिपूजन करुन करण्यात आली. समाजातील दिनदलीत , गोरगरिब, पोषित पीडित,तांडा,वाड्या वस्ती, आदिवासी हा प्रत्येक घटक हा विकासाच्या प्रवाहात आणण्याचे काम आदरणीय आमदार सौ श्वेताताई महाले पाटील ह्या करीत आहे. राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मा ना फडणविस साहेब यांनी मतदारसंघासाठी २५१५ अंतर्गत ७ कोटी रुपयाचा निधी दिला होता. निवडणुकीच्या काळात २५१५ अंतर्गत मतदारसंघात जवळपास ७ कोटीच्या कामाचे उद्घाटन ताईंनी केले होते .कामाच्या वर्क ऑर्डर सुद्धा झाल्या होत्या पण. राज्यात राजकीय घडामोडी घडून काँग्रेस चे सरकार उदयास आले ह्या काँग्रेस सरकारने
२५१५ च्या विकास कामावर स्थगिती. आणून ते कामे रद्द करण्यात आली. आतापर्यंत जेव्हा पण काँगेस – राष्ट्रवादी सत्तेवर आली तेंव्हा – तेंव्हा त्यांनी विदर्भावर अन्यायच केला.निवडणुकीच्या काळात जे उद्घाटन झालेले ७ कोटी रुपयाचे कामे आता आमदार निधीत टाकून पुर्ण करण्यात येत आहे. परत एकदा आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने सर्व जनतेचे फडणविस _शिंदे सरकार या राज्यात उदयास आले आहे. शिंदे फडणविस सरकारच्या माध्यमातून ताई ह्या विकास कामासाठी सतत पाठपुरवठा करुन निधि आणण्याचे काम करत आहे. येणाऱ्या काळात चिखली मतदारसंघाचा कायापालट होणार हे निश्चित आहे. मतदारसंघातील प्रत्येक गावातील मंडळींनी अंतर्गत राजकारण बाजूला सारून आपल्या गावाचा विकास साधावा… ताई ह्या आपला विकास करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सुद्धा त्यांनी यावेळी बोलले केले आहे.
यावेळी डॉ कृष्णकुमार सपकाळ तालुकाध्यक्ष भाजप, सरपंच गणेश जंजाळ ,सुधाकर मोरे तालुका उपाध्यक्ष भाजपा, हभप उद्धव महाराज जंजाळ अध्यात्मिक आघाडीचे तालुकाध्यक्ष भाजप, सुरेश इंगळे स्विय सहायक, अनमोल भाऊ ढोरे तालुका उपाध्यक्ष भाजपा ,विकास मोरे पाटील सर्कल प्रमुख, वासुदेव गायकवाड उपसरपंच, विष्णुपंत मोरे ग्रामपंचायत सदस्य ,विनोद मोरे ग्रामपंचायत सदस्य ,सागर जंजाळ ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक सहकारी सोसायटीचे उपाध्यक्ष सुधाकर जंजाळ, दिनकरराव जंजाळ , देविदास मोरे ,अरुण भाऊ जंजाळ ,राजू सदावर्ते, अश्रबा चिंचोले, समाधान पाटील जंजाळ ,सत्यनारायण पाटील, समाधान मोरे ,गजानन जंवजाळ, भिकाजी घेवदे , मनोहर चव्हाण, नामदेव जंवजाळ, डॉ किरण चिंचोले, दीपक मांडवे,रवी जोहरे ,डोंगरे मामा ,भिकाभाऊ कव्हळे , पंजाबराव कव्हळे,संजय कव्हळे,भास्कर झोहरे, विनोद खुर्दे यांच्यासह महिला व बंधू भगिनी मोठया संख्येने उपस्थित होते..
Users Today : 21