अकोट. प्रतिनिधी, विशाल गवई;अकोट तालुक्यातील बेलुरा गावातील गरीबांच्या घरात पावसाचे पाणी शिरल्याने व अन्न धान्याची नासाडी झाली असल्याने कबाड कष्टकरी लोकांच्या घरात चुली पेटल्या नसतांना येथील गरीबांची हाक जाणनारे प्रहार चे सरपंच राम पाटील मंगळे यांनी सर्वांना फराळ व नाष्ट्याची व्यवस्था केली व संध्याकाळी जेवणाची व्यवस्था केली हि व्यवस्था राम पाटील मंगळे यांनी गेल्या दोन दिवसांपासून बेलुरा गावामध्ये सुरू आहे तसेच ढगफुटी झाल्यामुळे नागरिकांचे व शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यांना स्वयंपाक करता येत नव्हता म्हणून प्रहार सरपंच राम पाटील मंगळे यांच्याकडून लोकांना फराळ तसेच संध्याकाळचे अन्नदान सुद्धा केले तसेच तहसीलदार मडके या सदर घटनेची माहिती दिली व तहसीलदार मडके हे बेलुरा गावात हजर झाले त्यावेळी राम पाटील मंगळे यांनी पटवारी आणि सचिव यांना बोलवून लवकरात लवकर सर्वे करून तात्काळ मदत द्यावी अशी मागणी केली.व गरीबांच्या घरात ढगफुटी चे पाणी घुसल्याने येथील जनतेवर आलेल्या प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी शासनाने तातडीने मदत जाहीर करावी अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे.तेव्हाअशा राम पाटील मंगळे या दानदात्याचे सर्व गंरीब वर्गातील लोकांनी आभार व्यक्त केले आहेत.
Users Today : 22