.१५आँक्टोंबर २०२२ आदर्श विद्यालयामध्ये वाचन प्रेरणा दिवस भारताचे ११वे राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या जन्मदिवसानिमित्ताने १५ ऑक्टोबर हा दिवस वाचन प्रेरणा दिवस तथा जागतिक हातधुवा दिन आदर्श विद्यालयाच्या ग्रंथालय विभागाच्या माध्यमातून आदर्श विद्यालयांमध्ये साजरा करण्यात आला यामध्ये आदर्श विद्यालयातील ग्रंथालय विभागाच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य समाधानजी शेळके सर तसेच उपप्रचार्य श्री प्रमोदजी ठोंबरे सर पर्यवेक्षक श्री रमेश जाधव सर पर्यवेक्षक श्री गणेश नालिंगे सर व तसेच ग्रंथालय प्रमुख राधा राजे देशमुख मॅडम उपस्थीत होते व पारितोषिक विभागप्रमुख श्री मुकेशजी भवर सर यांनी सन 2019-20 मध्ये ग्रंथालयाच्या विविध स्पर्धेमध्ये सहभागी असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे रोग पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला यावेळी 2019 20 मध्ये ग्रंथालयात विभागातर्फे घेण्यात येणाऱ्या हस्तालिखीत स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक श्री राहुल पवार सर सौ ज्योती भावसार मॅडम विनोद बाहेती सर वैभव शिंगणे सर यांना रोखपारीतोषीक व प्रमाणपत्र देवुन गैरव करण्यात आला.. तसेच हातस्वच्छता दिनाच्या निमित्ताने उपप्राचार्य श्री.प्रमोद ठोंबरेयांनी हात स्वच्छता अभियानांतर्गत हात धोण्याचे महत्व सांगीतले वयाचे औचित्य साधत आदर्श विद्यालयामध्ये आज तालुका नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र आशा पर्यवेक्षिकाअलका सुखदेव राजपूत मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी स्वच्छता कशी करावी हात कसे धुने याचे प्रात्यक्षिक झाले वैयक्तिक स्वच्छतेवर कु.साक्षी पवार या हीने सर्वांना प्रार्थना (शपत)सर्व विद्यार्थी शिक्षकाच्या सह घेतली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्राचार्य समाधानजी शेळके सर यांनी स्वच्छतेचे महत्त्व सांगत हात कसे धुणे व हात धुतल्यामुळे कशा आपले परिवार स्वच्छ राहतो व परिवार निरोगी कसा राहतो याचे महत्त्व सांगितले व वाचन प्रेरणा दिनानिमित्ताने ग्रंथालयामध्ये आपण जाऊन ग्रंथालयातील पुस्तके वाचली पाहिजे पुस्तकातून ज्ञानग्रहण केलं पाहिजे ग्रंथालयाचा सभासद झाले पाहिजे असे विचार व्यक्त करत वाचन प्रेरणा दिनाचे महत्त्व आपल्या विचारातून व्यक्त केले या कार्यक्रमासाठी श्री.नंदकीशोर म्हस्के श्री.सिध्देश्वर सर,श्री.शंभु तांबोळी सर यांनी मोलाचे सहकार्य केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्ग ९वा (ड )च्या विद्यार्थ्यांनी कु. राजकन्या धनवे व कु. पूर्वा धनवे यांनी केले या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री विकास जाधव सर यांनी केले.
Users Today : 20