प्रतिनिधी अशोक भाकरे खुले नाट्यगृह परिसरात लघुशंकेसाठी गेलेल्या एका व्यक्तीला अनोळखी दोघांनी मारहाण करून त्यांच्याकडील रक्कम 1800,रू बळजबरीने हिसकावून घेतले. ही घटना शनिवारी दुपारी 1:30 वाजताच्या सुमारात घडली या प्रकरणात सिटी कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला जुने शहरातील शिवाजी नगरात राहणारे सचिन गिऱ्हे (35) यांच्या तक्रारीनुसार ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुल्या नाट्यगृहाजवळील एका कापड दुकानात काम करतात दुपारी ते लघु शंका करण्यासाठी खुल्या नाटकेगृहाच्या मागील बाजूस गेले या ठिकाणी आलेल्या अनोळखी दोघांनी त्यांना लोखंडी वस्तूने मारहाण करून जखमी केले आणि त्यांच्याकडील 1800 रुपये हिसकावून पळ काढला गिऱ्हे यांच्या तक्रारीनुसार दोघाविरुद्ध गुन्हा दाखल केला
Users Today : 20