पोलिसांना खोटी माहिती दिल्याच्या संशयातून एकास मारहाण.

Khozmaster
1 Min Read
प्रतिनिधी
प्रविण चव्हाण
नंदुरबार -:शहरातील साक्रीनाका परिसरात पोलिसांना खोटी माहिती दिल्याच्या संशयातून एकास मारहाण केल्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .या बाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार , नंदुरबार शहरातील साक्री नाका परिसरात शाहरुख अली अहमद खान यांनी पोलिस ठाण्यात खोटी माहिती दिल्याचा संशय घेत शान रामसिंग गावित याने हातातील लोखंडी कड्याने डोक्यावर मारुन दुखापत केली .
     तसेच दिनेश कंपू कोकणी याने काठीने मारहाण केली व राहूल उत्तम भील याने पोलिसात तक्रार केली तर जिवेठार मारण्याची धमकी दिली . या बाबत शाहरुख अली अहमद खान यांच्या फिर्यादी वरुन नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात तिघांविरोधात भादंवि कलम ३२४ , ३२३ , ५०४ , ५०६ , ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
 पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक विकास गुंजाळ करीत आहेत .
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *