अल्पवयीन मुलीची साडेतीन लाखात विक्री करून केला बलात्कार , सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल.

Khozmaster
2 Min Read
प्रतिनिधी
प्रविण चव्हाण
नंदुरबार -:16 वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्रासाठी ३ लाख ६० हजार रुपयामध्ये विक्री करून तिच्यावर वेळोवेळी जबरीने बलात्कार केल्या प्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे . याबाबत अधिक माहिती अशी की , धडगाव तालुक्यातील तेलखेडीचा अठठारीपाडा येथून 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला 7 मार्च 2022 रोजी संदिप पावरा व संगीता पावरा यांनी अल्पवयीन पिडीतास पाहुणी म्हणुन घरी घेऊन जातो असे सांगुन टेंभुर्णी ता . म्हाढा जि . सोलापुर येथे पळवुन नेले .
 सुक्रिया महाडीक याच्या मध्यस्थीने सुक्रिया महाडीकचा शालक गोविंद यास ३ लाख ६० हजार रुपयामध्ये पिडीत युवतीची विक्री केली.त्याने संशयित आरोपींच्या उपस्थितीत लग्न केले . गोविंद याने लग्न करुन त्याच्या घरात वेळोवेळी अल्पवयीन पिडीताचे इच्छेविरुध्द जबरीने शारीरीक संबंध केले .
म्हणुन फिर्यादीवरून धडगाव पोलिस ठाण्यात सुक्रिया महाडीक रा टेंभुर्णी ता.म्हाढा , जि . सोलापुर , सुक्रिया महाडीकचा शालक गोविंद रा . आलेगाव ता . म्हाढा , जि . सोलापुर , संदिप सुकलाल पावरा , संगीता संदिप पावरा रा.राडीकलम , धडगाव , गोविंदची आई व गोविंदचे वडील दोन्ही रा आलेगाव , ता . म्हाढा , जि . सोलापूर यांच्या विरुद्ध भादंवि क ३७६ ( २ ) ( एन ) ३६६ ( अ ) ३७२ ३७३ लैगिंक अपराधापासुन बालकांचे संरक्षण २०१२ चे क ५ ( एल ) ६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
   या प्रकरणी पुढील तपास पोसई डी . के . महाजन करीत आहेत
0 8 9 4 5 7
Users Today : 23
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *