बोरघर / माणगाव ( विश्वास गायकवाड ) दक्षिण रायगड जिल्हा वंचित बहुजन आघाडी कडून आपणा सर्वांना कळविण्यात येते की, रायगड जिल्हा निरिक्षक तसेच प्रदेश कमिटीच्या आदेशाने, रोहा तालुका व रोहा शहर कार्यकारणी तयार करणे संदर्भात रविवार दिनांक २३ ऑक्टोंबर २०२२ वार रविवार वेळ दुपारी ठीक.२०:३० वाजता शासकीय विश्राम गृह कोलाड रोहा या ठिकाणी रोहा तालुका व रोहा शहर कार्यकारणी अध्यक्ष / महासचिव तसेच अन्य सर्व पदांकरिता मुलाखती घेण्यात येणार असून सदर मुलाखती करिता इच्छुक उमेदवारांनी आपले परिचय पत्र घेऊन मुलाखतीस हजर रहावे सदर मुलाखती रायगड जिल्हा अध्यक्ष आणि महासचिव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये घेण्यात येणार असून त्यानंतर नवनिर्वाचित तालुका कार्यकारिणी ही पक्षाच्या राज्य मध्यवर्ती कार्यालयामध्ये अंतिम मंजुरी करता पाठवण्यात येईल, आणि लवकरात लवकर प्रसिद्ध करण्यात येईल. सदर मुलाखती करिता रोहा तालुक्यातील व रोहा शहरातील सर्व सदस्य कार्यकर्ते आजी माजी पदाधिकारी विविध सामाजिक संस्थांमध्ये काम करत असणाऱ्या इच्छुक उमेदवारानी मुलाखतीमध्ये येऊन मुलाखत देऊ शकतात तरी कृपया सर्वांनी सदर मुलाखतीस उपस्थित रहावे. असे आवाहन मा. सागर महेंद्र भालेराव रायगड जिल्हा (दक्षिण) महा सचिव यांनी केले आहे.
Users Today : 20