पीकविमा भरण्याचे अवाहन करणारांनी लाज बाळगावी

Khozmaster
1 Min Read

_विष्णुपंत भुतेकर   संस्थापक अध्यक्ष           भूमिपुत्र    शेतकरी संघटना_   राज्यातील शेतकऱ्यांना पीकविम्याच्या फसव्या मोहातून बाहेर काढण्या संदर्भात भूमिपुत्र कडुन गेल्या पंधरा वर्षांपासून सातत्यपूर्ण लढा सुरू आहे. नैसर्गीक आपत्तीत शासन मदत करत आसतांना पीकविमा कंपनी कडुन शेतकऱ्यांचे पीक नुकसानीचे दावे फेटाळण्यात येत आहेत. खरीपातील पीक शेतकऱ्यांच्या हातातुन गेले. अती व अवेळी पाऊसाने सोयाबीन, तुर, कापुस, उडीद, मुंग व भाजीपाला उत्पादकांचे नुकसान झाले आहे. विमा कंपनीने अदयापही खरीपाचा पीक विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्याचा निर्णय घेतलेला नाही. पीक विमा भरू नका म्हणून भूमिपुत्र कडुन अवाहन केले जात आसतांना अनेक शासकीय अधीकारी पीक विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त करत होते. आता जेव्हा विमा कंपनीकडून हजारो शेतकऱ्यांचे नुकसानीचे दावे नाकरले जात आहेत आशा वेळी विमा भरायला लावणार्या अधिकाऱ्यांनी लाज बाळगुन शेतकऱ्यांना हक्काचा विम्याचा मोबदला मिळवुन दिला पाहीजे. रोज किती शेतकर्यांना विम्याचा मोबदला दिला गेला, किती टक्के दिला गेला, किती शेतकऱ्यांचे दावे नाकरले, त्याची कारणे हे सर्व पारदर्शक पणे तालुका व जिल्हानिहाय विमा कंपनीने जाहीर केले पाहीजे. दिवाळी सारखा सन आसुनही विमा कंपनीकडून मोबदला दिला गेला नाही. एक नोव्हेंबर पर्य॔त शेतकऱ्यांना विम्याचा मोबदला न मिळाल्यास भूमिपुत्र कडुन विमा कंपनी व प्रशासना विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल असा इशारा भूमिपुत्र कडुन देण्यात आल्याचे विष्णुपंत भुतेकर यांनी सांगीतले आहे.

 

0 9 4 6 0 6
Users Today : 20
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *