अल्पसंख्याक घटकाचे पंतप्रधान आवास योजनेतील घरकुलाचे ग्रामीण भागातील उद्दीष्ट ग्रामपंचायतींना देण्यात यावे- रफ़ीक शेख

Khozmaster
2 Min Read

प्रतिनिधि रफीक खान-उदयनगर:-चिखली तालुक्यातील पंतप्रधान आवास योजनेच्या प्रपत्र `ड` यादीनुसार पात्र अल्पसंख्याक लाभार्थ्यांचे शासनाकडुन उद्दीष्ट प.स.चिखली कार्यालयाला देण्यात यावे या मागणी करिता मा.जिल्हाधिकारी साहेब बुलढाणा यांना गट-विकास अधिकारी पंचायत समिती चिखली यांच्या मार्फ़त दिनांक 27 ऑक्टोम्बर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभाग चिखली तालुका अध्यक्ष रफ़ीक शेख यांच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले.

दिलेल्या निवेदनात नमूद असे की चिखली तालुक्यात ग्रामीण भागात पंतप्रधान आवास योजना(घरकुल)चे प्रपत्र `ड` ‘यादिनुसार पात्र झालेल्या लाभार्थ्यांची यादया ग्रामपंचायत कार्यालयात प्राप्त असून त्या मधील अल्पसंख्याक घटकातील पात्र लाभार्थ्यांचे उद्दिष्ट पंचायत समीतीला प्राप्त न झाल्यामुळे चिखली तालुक्यातील कोणत्याही ग्रामपंचायत कार्यालयाला अल्पसंख्याक घटकातील पात्र लाभर्थ्यांचे घरकुलचे उद्दिष्ट देण्यात आलेले नाही परंतु इतर पंतप्रधान आवास योजनेच्या प्रपत्र `ड`यादीतील मागास्वर्गीय व इतर या दोन यादीतील पात्र लाभार्थ्यांचे उद्दिष्ट तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायत देण्यात आलेले असून घरकुलच्या बांधकाम करिता पहिला हप्ता म्हणून लाभार्त्यांच्या बँक खात्यात निधी देऊन घरकुल बांधकाम सुद्धा सुरु झालेले आहे तर फक्त अल्पसंख्याक समाजाचे घरकुल

योजनेचे लाभाचे उद्दीष्ट का मिळाले नाही असा प्रश्न अल्पसंख्याक समाजाला पडला आहे व यामुळे मुस्लिम समाजात संभ्रम निर्माण झाला आहे तरी में साहेबांना निवेदनाद्वारे विनंती करण्यात येते की सदर पंतप्रधान आवास योजनेच्या(घरकुल)अल्पसंख्याक घटकाच्या उद्दीष्ट बाबत त्वरित दखल घेण्यात यावी व चिखली तालुक्यातल सर्वच ग्रामपंचायत कार्यालयाला अल्पसंख्याक घटकाचे नियमानुसार उद्दिष्ट देऊन घरकुल बांधकाम सुरु करण्यात यावे या बाबत दखल न घेतल्यास जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा समोर लोकशाही मार्गाने राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागच्या वतीने तिव्र आंदोलन छेडन्यात येईल असा इशारा दिलेल्या निवेदना द्वारे देण्यात आला आहे

निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभाग चिखली तालुका अध्यक्ष तथा उदयनगर(उन्द्री)ग्रामपंचायत सदस्य रफ़ीक शेख,राष्ट्रवादी काँग्रेस चिखली तालुका अध्यक्ष दीपक म्हस्के, उपाध्यक्ष शेख आसिफ भाई,प्रशांत झीने,प्रवीण कांबळे, शारिक शेख , मालिक सौदागर, ता.सरचिटणीस शेख रहमान भाई,रा. कॉ. यू तालुका उपाध्यक्ष राजिक खान,शहर अध्यक्ष शेख बिस्मिल्ला,गणेश भगत,शेख शाहिद,राजा खान,ऐहसान सौदागर,शोराब JB टेलर,वासिम खा, निसार खान,शेरखान,सय्यद जफर,शेख आरिफ,अय्यूब खा, सोहेल खान,शेख मोहसिन,शेख अरबाज यांच्या सह्या आहेत.

0 9 4 6 0 6
Users Today : 20
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *