विनोद वसु, अकोट ता. प्रतिनिधी-टाकळी बु या वर्षी झालेल्या अतिपावसामुळे टाकळी बु ते पिलकवाडी हा रस्ता अत्यंत चिखलमय झाला असून, रस्त्यात झालेल्या चिखलामुळे वाहने फसत असल्यामुळे शेतकऱ्यांनी शेतमाल घरी आणावा तरी कसा अशी चिंता शेतकऱ्यांना सतावित आहे.
अकोट तालुक्यातील टाकळी बु ते पिलकवाडी हा कच्चा रस्ता असून या रस्त्याला लागून शेतकऱ्यांच्या जमीनी आहेत . तर अनेक शेतकऱ्यांना याच रस्त्याने जाणे येणे करून शेतमाल घरी आणावा लागतो. मात्र या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे वरीलरस्त्यामध्ये मोठ्या प्रमाणात चिखल झाला आहे. चिखलमय रस्त्यातून पायी जाणे अथवा वाहने नेणे अवघड झाले आहे. तालुकास्तरीय प्रशासनाने या गंभीर समस्येकडे तात्काळ लक्ष द्यावे, अशी मागणी टाकळी बु येथील शेतकरी रामकृष्ण नागोराव वसु यांनी केली आहे.
Users Today : 22