सोयगाव- प्रतिनिधी ,गोकुळसिंग राजपूत
- सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथे आज दिनांक एक सप्टेंबर 22 रोजी सद्गुरु श्री गजानन महाराज पुण्यतिथीनिमित्त व ऋषी पंचमी निमित्त सावळदबारा येथील श्री सद्गुरु गजानन महाराज मंदिर कोलते पाटील पेट्रोल पंपा जवळ देव्हारी रोड येथे मोठ्या थाटामाटात संपन्न करण्यात आला मागील दोन वर्षाच्या कोविड-19 या महामारीमुळे सदरील ऋषीपंचमीचा कार्यक्रम हा रद्द करण्यात आलेला होता परंतु सावळदबारा येथील जे कालिंका देवी शिक्षण संस्था अध्यक्ष श्री भाऊराव लक्ष्मणराव कोलते यांनी आपल्या पेट्रोल पंपाजवळ उभारलेल्या भव्य अशा गजानन महाराज मंदिरामध्ये यावर्षी अन्नदाते सुदाम गोबरा राठोड शिक्षक व सरपंच पठाण तांडा यांनी आज महाप्रसादाचे आयोजन केले होते भागातील अनेक वारकरी संप्रदायाच्या पालखी व दिंडी सोहळा या ठिकाणी येत असतो अनेक भक्तगण सद्गुरूंच्या चरणी आपले नवस फेडण्यासाठी येत असतात अनेक भक्तांचे सद्गुरूंच्या चरणस्पर्शाने जीवन धन्य झाले अशी चर्चा सदैव परिसरात चालू असते. आणि नवसाला पावणारे हे मंदिर व येथील सुबक व आकर्षित मूर्ती माणसाचे मन मोहन घेते आणि साहजिकच त्याचे फळ हे अनेक भक्तगणांना या मंदिराच्या दर्शनाने लाभले आहे अशी चर्चा परिसरामध्ये सतत चालू असते. दर गुरुवारी या मंदिरावरती अनेक भक्तगण आपल्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करतात हे विशेष दर गुरुवारी परिसरातील व सावळदबारा येथील सद्गुरु श्री गजानन महाराज भक्त या ठिकाणी सद्गुरु गजानन महाराज यांची बावन्नी वाचन करून आरतीने या कार्यक्रमाचा समारोप होतो व त्यानंतर महाप्रसादाचा वाटप होता नवसाला पावणारे हे मंदिर म्हणून याची ख्याती आज परिसरामध्ये दुमदुमून गेलेला होता त्यामुळे दररोज सकाळ संध्याकाळ सुद्धा येते पूजा अर्चना चालत असते याचाच भाग म्हणून अन्नदाते सुदाम राठोड यांनी सहपरिवारासहित आज हा ऋषिपंचमी सोहळा सद्गुरु गजानन महाराज मंदिर येथे अन्नदानाच्या माध्यमातून साजरा केला या सर्व कार्यक्रमासाठी गावातील अनेक भक्तगण व परिसरातील मंडळी सरळ हाताने मदत करतात यावेळेस वारकरी संप्रदायाचे भ.भ.प.वासुदेव महाराज खडके, पंढरी महाराज सपाटे, सुनील महाराज राजपूत, भागवत महाराज महाजन, हभप.आबराव महाराज कोलते, बेलाप्पा पन्हाळे, बेलाप्पा कर्दळे, आनंदाप्पा चोपडे, रामचंद्र चिमणकर, सखाराम कोते, बाबू खांदे, भगवान टिकारे, सोपान मानकर, गजानन सुरपाटणे, दीपक गावडे,योगेश टिकारे,मयूर महाजन, हभप विशाल खडके, हभप किशोर गावडे व गावातील अनेक महिला संप्रदायाच्या भक्तगण उपस्थित राहतात अशी माहिती प्राध्यापक जीवन कोलते(सामाजिक कार्यकर्ते) यांनी दिली
Users Today : 8