रितेश कुमार टीलावत;तालुका प्रतिनिधी -तेल्हारा-येथील गुरुदेव सेवा मंडळातर्फे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ५४ वी पुण्यतिथी स्थानिक गणपती संस्थान मध्ये साजरी करण्यात आली. सुरुवातीला सर्व गुरुदेव भक्तांनी दिप प्रज्वलन करून राष्ट्रसंतांच्या प्रतिमेचे पूजन केले.त्या नंतर महेंद्र कराळे यांनी राष्ट्रसंताचे राष्ट्र उभारणीतील कार्य,ग्रामगितेच्या माध्यमातून महाराजांना अपेक्षित असलेला समाज बदल तसेच तुकडोजी महाराजांच्या जीवनातील महत्वपूर्ण घटना सांगितल्या व महाराष्ट्रातील गाथा,ज्ञानेश्वरी व ग्रामगीता हा अमूल्य ठेवा असल्याचे प्रतिपादन केले. यावेळी गुरुदेव भक्तांनी तुकडोजी महाराज रचित अनेक भजने सादर करत महाराजांना आदरांजली अर्पण केली. यावेळी गुरुदेव भक्त रमेश मानकर गुरुजी,ज्ञानदेव वाघ,सुभाष कसुरकार, श्रीकृष्ण उंबरकार, दशरथ डांगे,नरेश निंबोकार,हरिभाऊ पाचपोर, दाऊदास शर्मा,किसनराव कणपटे,उत्तम वाकोडे,सुरेश बाभुळकर,सुभाष भगत,गजानन पिंजरकार, सुभाष बकाल,राजेश भटकर,राजेश पांडव,इंगळे महाराज, सदाफळे महाराज,सौ.इंगोले ताई इत्यादी उपस्थित होते.
Users Today : 39