राष्ट्रीय एकता दिवस निमित्त एल. आर. टी. कॉलेजच्या एन. सी. सी. कॅडेट्सचा एकता दौंड मध्ये उत्कृष्ट सहभाग

Khozmaster
3 Min Read

दि. बेरार जनरल एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित श्रीमती एल. आर. टी. वाणिज्य महाविद्यालयाचे एन. सी. सी. कैडेट्स नी राष्ट्रीय एकता दिवस निमित्त आयोजित एकता दोड मध्ये सहभाग दाखविला. राष्ट्रीय एकता दिवस तथा नॅशनल युनिटी डे निमित्त ११ महाराष्ट्र बटालियन एन. सी. सी. युनिट द्वारा पाच किलोमीटर युनिटी रन कमांडिंग ऑफिसर कर्नल बिजॉय चौधरी यांच्या मार्गदर्शनानुसार आयोजित करण्यात आली. डॉ पंजाबराव कृषी विद्यापीठ येथील स्टेडियमवर अकोला जिल्ह्यामधील सर्व एन. सी. सी. कॅडेट एकत्रित जमले होते. ह्यावेळी 250 पेक्षा अधिक एन. सी. सी. कॅडेटनी या युनिटी एकता दौंड मध्ये सहभाग नोंदविला. यामध्ये एल. आर. टी. महाविद्यालयाचे 30 एन. सी. सी. कैडेट सहभागी होते. तसेच त्यांना प्रमाणपत्र देउन कॅडेटचा आत्मविश्वास वाढविला. यावेळी ११ महाराष्ट्र बटालियनचे सुभेदार अशोक कुमार शर्मा, सुभेदार तेजवीर, सुभेदार दर्शन सिंग, हवालदार आशिष आठवले, हवालदार श्याम पून तसेच श्रीमती एल. आर. टी. वाणिज्य महाविद्यालय अकोला चे एन. सी. सी. ऑफिसर कॅप्टन डॉ. अनिल तिरकर, कॅप्टन डॉ. आनंदा काळे, लेफ्टनंट डॉ. दारासिंग राठोड, लेफ्टनंट शिरसाट मॅडम, एन. सी. सी. ऑफिसर अनिल बंड, हेमंत ओझरकर, राजेश पाठक, सागर निळे, हेमंत निर्खे, महेश ठोके, परमेश्वर राऊत, शिल्पा बाजाड मॅडम आणि महाविद्यालयामधील व शाळेमधील असंख्य एन. सी. सी. कॅडेटस या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांमध्ये तसेच एन. सी. सी. कॅडेट मध्ये शिस्त व एकता निर्माण व्हावी म्हणून अशा प्रकारच्या युनिटी दौड आयोजित करण्यात येतात. आपल्या जीवनामध्ये आपले आयुष्याचे ध्येय गाठण्याकरिता सतत चिकाटी, परिश्रम या गोष्टींची आवश्यकता आहे हे सर्व गुण त्यांनी एन. सी. सी. मध्ये राहून शिकणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ११ महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल बिजॉय चौधरी यांनी यावेळी केले. यावेळी विद्यार्थ्यांनी स्टेडियम पासून पाच किलोमीटर पर्यंत वेगवेगळ्या मार्गावरून दौड केली. यावेळी श्रीमती एल. आर. टी. वाणिज्य महाविद्यालयाचे एन.सी.सी कैडेट्स सार्जंट जयश्री हरसुलकर, सार्जंट ऋषिकेश पटेल, सीपीएल ओम डांगे, कॅडेट मयूरी बरदिया, कॅडेट पुर्वा देवघरे, कॅडेट तनाया नाफाडे, कॅडेट किरण माने, कॅडेट साक्षी झटाले, कॅडेट धनश्री चव्हाण, कॅडेट लक्ष्मी सुले, कॅडेट हर्षा गायकवाड़, कॅडेट तेजस डांगे, कॅडेट शिवम देशमुख, कॅडेट अरविंद कुमार यादव, कॅडेट हर्षल पाल, कॅडेट प्रणव वानखेड़े, रोशन इंगोले, कॅडेट प्रणव इंगोले, कॅडेट जय नांदोडे, कॅडेट अनिकेत शिरसागर, कॅडेट साहिल बुंदेले, कॅडेट यशवंत हरसुलकर, कॅडेट स्वराज बोदाडे, कॅडेट यश कमलकर, कॅडेट राहुल हिवराले, सोकांश ढवने, कॅडेट विशाल गवई, कॅडेट मंंथन गोलेट, कॅडेट त्रिशभ कोकाटे, कॅडेट नयन घुंघे यांचा उत्स्फूर्त सहभाग होता.

 

0 9 4 5 4 6
Users Today : 11
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *