प्रतिनिधी (संजय धाडवे) आम आदमी पार्टी नाशिकच्या वतीने अशोका रोड व वडाळा रोड चौफुली येथे ढोल बजावो आंदोलन करण्यात आले
गेल्या अनेक दिवसांपासून आम आदमी पार्टीच्या निवडणूक समितीच्या माध्यमातून नाशिक मध्ये रस्त्यांना असलेल्या खड्डे बुजवून रस्ते नीट करणे बाबत ऑगस्ट महिन्यापासून महानगरपालिका आयुक्त याना निवेदन देऊन तसेच रस्त्यावरील खडया जवळ भोंगा वाजून आंदोलन करण्यात आले तसेच दिनांक 31 ऑक्टोबर रोजी नाशिक शहर अभियंता याना निवेदन देऊन चर्चा करण्यात आली होती त्या नुसार 1 नोव्हेंबरला रस्त्याची पाहणी करण्यासाठी महानगरपालिका अधिकारी 10 वाजता उपस्थित राहतील असे अश्वासन देण्यात आले होते ,परंतु अधिकारी 10 वाजता वेळेवर उपस्थित न राहिल्याने आम आदमी पार्टीच्या वतीने अँड प्रभाकर वायचळे यांच्या नेतृत्वात आज ढोल बजावो आंदोलनास सुरवात केली .
त्यानंतर 11.15 ला महानगरपालिका अधिकारी उपस्थित झाले,
त्यानंतर वडाळा रस्ता तसेच अशोका रस्ता व जेमसिटी रस्ता अधिकाऱ्याना दाखविण्यात आला तसेच त्यावेळेस रस्त्यावरील खड्डे ,कच ,धूळ अधिकाऱ्यांना दाखविण्यात आली ,
तसेच जेमसिटी चौक येथे रस्त्याचे कामकाजास तातडीने सुरवात करण्यात आली
यावेळी आम आदमी पार्टीचे अँड बंडू नाना डांगे नाशिक स्टार प्रचारक ,अमोल लांडगे मध्य विधानसभा उपाध्यक्ष ,अनिल कोशिक सचिव ,अल्ताफ शेख खजिनदार , डॉ गणेश मोठवानी संघटन प्रमुख , चंदन पवार प्रसिध्दी प्रमुख ,माजिद पठाण आंदोलन प्रमुख ,साहिल सिंग मिडिया व्यवस्थापक नाशिक शहर ,नितीन भागवत पूर्व विधानसभा उपाध्यक्ष , दीपक सरोदे देवळाली विधानसभा प्रसिद्धी प्रमुख ,नाविंदर आलीवलीया सह आंदोलन प्रमुख ,अमर गांगुर्डे प्रभाग प्रमुख ,प्रदीप लोखंडे प्रभाग प्रमुख , प्रमोधिनी चव्हाण मॅडम ,मुझाइद शेख ,सादिक अत्तर, नदीम शेख ,तन्वीर अन्सारी व इतर नागरिक उपस्थित होते ,
नाशिक शहरातील रस्ते लवकरात लवकर खड्डे मुक्त न झाल्यास अधिकारी यांचे निवस्थान बाहेर तसेच महानगरपालिका कार्यलयाबाहेर ढोल बाजावो आंदोलन केले जाईल असा इशारा देखील अँड प्रभाकर वायचळे यांनी अधिकाऱ्यांना दिला
Users Today : 22