अमीर प्रश्न ..

Khozmaster
1 Min Read

चांदीचे भाव चढते

चांदीची चाले चांदी 

काय बुवा महागाई 

कोण युगाची नांदी 

 

सोन्याचे झाले सोने

कसली सुवर्णसंधी

सोन्यासोनझळाळी

रे कुठे पळाली मंदी

 

डोळे पुसा श्रीमंतांचे

कुणीचं नसे आनंदी

कुणीतरी घाला लक्ष

का बसले ढिम्म नंदी

 

दागिन्यांचे जीएसटी

उगाच लावता नादी

अमीरांचे श्रीमंतप्रश्न

सोडवावे जरा आधी

 

बारीक होते श्रीमंती

जाण कसली व्याधी

कशी चालते घसरण

पहा फोर्बस् ची यादी

 

नाराज होता श्रीमंत

धोक्यात येणार गादी

तेचआपले तारणहार 

असे गोष्ट सरळसाधी

 

– हेमंत मुसरीफ पुणे 

  ९७३०३०६९९६..

  www.kavyakusum.com

 

0 9 4 2 4 9
Users Today : 6
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *