कार्तिक एकादशी..

Khozmaster
1 Min Read

कार्तिक एकादशी..

 

शैव वैष्णव एकहोई

एकादशी प्रबोधिनी

विठू बाळे संगे खेळे

मुहूर्त बरवा साधुनि

 

दिवाळी नंतर पुन्हा

दिवाळी ये परतुनि

चातुर्मास सुखेसंपन्न

पुण्य कर्म हो हातूनि

 

झाले जागे शुभदिनी 

विष्णू योग निंद्रेतूनि

रे देव उठी एकादशी

नाम दुसरे देवोत्थनी

 

तुळसीविवाहआरंभ

नवोन्मेष उसळे मनी

हरि हराची भेट होई

सांप्रदाया उल्लंघुनि

 

एकादशी सत्वजाणी

अर्थसार्थ पद्मपुराणी

रे एकरुप एकशक्ती

शीव अन् चक्रपाणी 

 

एकएकादशीचेपुण्य

अश्‍वमेध सहस्त्राणि

उपवास फल प्राप्ती 

राजसूय यज्ञ शतानि

 

– हेमंत मुसरीफ पुणे

  9730306996.

  www.kavyakusum.com

0 9 4 2 4 9
Users Today : 6
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *