हिंगणा येथेश्री लल्लूसाई पालखी सोहळा साजरा!

Khozmaster
1 Min Read
देवेंद्र सिरसाट.
नागपूर.
                                    दरवर्षी प्रमाणे याही वर्षी १ सप्टेंबरला लल्लूसाई चॅरिटेबल ट्रस्ट हिंगणाच्या वतिने ऋषीपंचमी निमित्त लल्लूसाई पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. रायपूर गावातून पालखी सोहळा भ्रमण करुन इसासनी येथील श्री लल्लूसाई महाराजांच्या मठावर गेला आणि महाप्रसाद, भजन, पूजन, कीर्तना सह पालखी सोहळ्याची सांगता झाली.त्या आधी सर्व भावीक भक्तांनी पालखी सोहळ्याचं इतकं सुंदर प्रदर्शन केले की पूर्ण हिंगणा नगरी लल्लूसाईच्या नावाने दुमदुमली आणि बाबांच्या नावाचे जय घोष करत पालखी मोठ्या उत्साहाने वार्ड क्रं. ५ मधून निघाली ठिकठिकाणी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.पालखी सोहळ्यात उपस्थित भक्तांमध्ये रायपुर हिंगणा ग्रामपंचायच्या उपसरपंच श्रीमती दिपाली ताई संदिप कोहाड,सौ प्रिती कोहाड यांनी सुद्धा बाबांच्या पालखी सोहळ्यात सहभाग घेऊन बाबांच्या दर्शनाचा लाभ घेतला तसेच हिंगणा रायपुर मधील यूवा सामाजिक कार्यकर्ते धर्मेंद्र कोहाड व त्यांचे सर्व मित्र परिवाराच्या वतीने अनेक ठिकाणी प्रसाद वितरण करण्यात आले. या करीता सचिन चानपुरकर , चंद्रकांत पराते, महेश चांदेकर, हेमंतजी धार्मिक,हर्षद निंदनवार,निकेशजी धार्मिक, राहूल सोनकुसरे,शुभम धार्मिक,आरिफ भाई शेख,प्रकाश धार्मिक,चंदू मानकर ,दिवाकर दुरबुरडे, संजयभाऊ खडतकर, लक्ष्मण दुरबुडे, निखिल खंगार इत्यादींनी परिश्रम घेतले.
0 8 9 4 8 1
Users Today : 11
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *