कोठा गावातील शेतकऱ्याची तक्रार वीजपुरवठा बंद असल्याने रब्बी पेरणी रखडली रितेश कुमार टीलावत तेल्हारा :तालुका प्रतिनिधी तालुक्यातील कोठा येथील विजय कोरडे यांच्या शेतात तुटलेल्या ताराची व वाकलेल्या खाबांची जोडणी गत चार महीण्यापासुन शेतातील विज पुरवठा खंडीत आहे आता शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील गहु हरभरा सह आदी पिकाची पेरणी करावी लागत असुन वीजपुरवठ्या अभावी पेरणी रखडली आहे कोठा गावाजवळील धर्माळ जवळील रोहीत्रावरुन परिसरातील सौ शिला गणेशराव अहेरकर, विजय कोरडे, प्रमोद कोरडे, गजानन अहेरकर, पंजाबराव अहेरकर, सुक्षमराव अहेरकर, दिलीप कोरडे विनोद कोरडे,संतोष कोरडे यां शेतकऱ्याना विज पुरवठा दिला जातो परंतु गत चार महीण्यापासुन शेतकरी विजय कोरडे यांच्या शेतात तारा व खाब तुटलेले आहेत तुटलेल्या ताराची व वाकलेल्या खांबाची दुरूस्ती तातडीने करण्याबाबत शेतकऱ्यानी विज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्याकडे मागणी केली परंतु कत्राटदाराकडुन मजुर न मिळाल्याने हे काम करण्यात येत नसल्याचे स्थानिक वायरमन कडून सांगण्यात आले गेल्या चार महीण्यापासुन शेतातील विज पुरवठा शुल्लक कारणामुळे बंद ठेवण्यात महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी धन्यता मानली असुन आपल्या कामात हे अधिकारी किती दक्ष आहेत हे यावरून दिसून येत आहे आधीच अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याच्या पिकाचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी हतबल आहेत आता रब्बी पेरणी साठी शेतकरी धावपळ करीत असताना महावितरण विभागाकडुन त्याची कु्रचष्टा सुरू झाली आहे शेतकऱ्याचा जास्त अंत न पहाता महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्वरित विज पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी शेतकऱ्याकडुन केली जात आहे
Users Today : 29