चिखली शहरात वरली,मटका,जुगार खुलेआम चाली;ठाणेदार साहेब कोणी आहे का या शहराचा वाली.?

Khozmaster
3 Min Read
चिखली :- गेल्या काही वर्षात तालुक्यातील तरुणाईमध्ये वाढत असलेल्या कमी गुंतवनुक करुन जास्त नफा कमावण्याच्या मानसिकतेमुळे अवैध धंद्याकडे अनेक तरूणांचा कल वाढला आहे. त्याचाच फायदा घेत शहरात अवैध धंद्यात जास्त प्रमाणात वाढ झालेली दिसत आहे़. अशा धंद्याकडे तरूणां वाढलेला कल आणि पोलिस विभागाकडून त्याकडे करण्यात येणारे दुर्लक्ष यामुळे अवैध धंद्यांना जणु मोकळे रानच मिळाले आहे.शहरातील विविध भागात सुरू असलेल्या या अवैध धंद्यांमुळे आता शहरातील अवैध धंद्यांना पोलिसांनी ‘एनओसी’च दिली की काय, असा प्रश्न सर्वसामान्यांमध्ये उपस्थित केल्या जात आहे.चिखली शहरासह ग्रामीण भागातील तरूण , आता कमी गुंतवणुकीत जादा नफा कमावण्याच्या नादात दारूविक्री, सट्टा पट्टी, जुगार, मटका ऑनलाइन चक्री अशा अवैध धंद्याकडे त्यांचा कल वळल्याचे दिसून येत आहे.  अवैध धंद्यात केवळ दोन ते तीन वर्षांत कमावता येतो असा त्यांचा समज आहे.त्यामुळे अधिक पैसा कमावण्याच्या लालसेनेच जिल्हाभर दारूचा व्यवसाय गृह उद्योग तर सट्टा पट्टी मटका, ऑनलाइन चक्री उदरनिर्वाहाचे साधन झाले आहे. तरूणांनी सट्टा पट्टीला स्वत:च्या उदरनिर्वाहाचे साधन बनविले आहे.  सट्टा पट्टीवर पैसा लावून जादा पैसा कमावण्यात तरूण लागले आहेत. सट्टा पट्टीवर तरूणांना १० रुपये मटका जोड़ १०००  रूपये मिळविता येत आहेत. क्रमांकाच्या अंदाजावर आकडेमोड करून मटका सट्ट्याचे गणित मांडल्या जातआहे. गरीब  तरुण शेतकरी कष्ट करी देखील सट्ट्याच्या आहारी गेले आहेत. मात्र या नादात पैसा मिळवण्यापेक्षा गमावणाऱ्यांची संख्या  खुप जास्त वाढत आहे. त्यातुनच कर्जबाजारीपणा आणि नशेच्या आहारी जाणारे तरुण जास्त गुन्हेगारी कडेही वळत आहे.
 या सट्टा पट्टीच्या नादी लागुण कित्येक गरीब घर बरबाद होत आहे. दिवसभर आकडे मोडीच्या गणिताचा अभ्यास करीत खुलेआम अवैध दुकान मध्ये बसेल असतात. शहरात कित्येक सट्टा पट्टी दलालांनी पट्टी घेण्याचे खुलेआम मटका दुकाने, लावलेले आहे. या अवैध धंद्यांनी कित्येक गरीब शेतकरी, रोज मजूरी करनारे कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत. तरीही या धंद्याच्या नादी लागणाऱ्यांची संख्या कमी झालेली नाही. या व्यवसायाबद्दल आरडाओरड झाल्यास काही दिवसांसाठी हे व्यवसाय छुप्या पद्धतीने चालविण्यात येतात. त्यानंतर मात्र, परिस्थिती जैसे थे असते.चिखली  या पोलिस ठाण्यांच्या हद्दीत खुलेआम सट्टापट्टीसह मटका जुगार , ऑनलाइन चक्री, अवैध दारु इतर अवैध व्यवसाय सुरू आहे. मात्र असे असतानाही या पोलिस ठाण्याकडून त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे आता वरली मटका जुगार खुलेआम चाली;कोणी आहे का या शहराचा वाली ही म्हणायची वेळ आता जनतेवर आली आहे.आता जिल्हा पोलिस अधीक्षक यांनीच या गंभीर बाबीकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.येणाऱ्या काळात आता हे अवैध धंदे बंद होतील की नाही हा प्रश्न सद्या अनुत्तरीच आहे.
0 8 9 4 7 1
Users Today : 1
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *