सकल धनगर समाजाचे नेते ॲड. सचिन नाईक, श्री. भास्करराव बेंगाळ ,युवा नेते अभिषेक बेंगाळ, अंकुशराव बेंगाळ, रवी गडदे, गंगाराम फटांगळे, अशोक भांदुर्गे, प्रकाशराव शिंदे,वामनराव पोले,केशव नाईक चिंचोलीकर, संतोषराव पोले, रामेश्वर पोले, सुभाषराव शिंदे,प्रशांत पोले,प्रितेश शिंदे व परिसरातील सर्व धनगर समाज बांधव उपस्थित होते. यावेळी ॲड. सचिन नाईक यांनी धनगर समाज एकत्र येणे गरजेचे आहे. आज संसदेमध्ये,विधिमंडळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपले धनगर समाजाचे सदस्य नगन्य आहेत. एवढा मोठा समाज असताना स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सुद्धा आपले लोक नाहीत ही चिंतेची बाब आहे. तरी सकल धनगर समाज बांधवांनी 12 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी ठीक 10:00 वाजता पार्डी मोड येथे जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे अशी विनंती केली.
Users Today : 29