राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बुलढाणा जिल्हा कार्यकार्यनीच्या सचिव पदी रफ़ीक शेख यांची नियुक्ती

Khozmaster
3 Min Read

उदयनगर:-प्रतिनिधि रफिक् खान येथील चिखली तालुका राष्ट्रवादी कॉन्ग्रेस अल्पसंख्याक विभागाचे तालुका अध्यक्ष तथा उदयनगर ग्रामपंचायत सदस्य रफ़ीक शेख यांची पक्षाने त्यांच्या केलेल्या सामाजिक व पक्ष कार्याची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष मा.अड़ नाज़ेर क़ाज़ी साहेब यांनी रफ़ीक शेख यांची जिल्हा सचिव पदी नियुक्ती केली आहे.चिखली तालुक्यातील उदयनगर (उन्द्री)येथील रफ़ीक शेख हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्षस्थापने पासून एकनिष्ट असून त्यांनी विविध पक्षाच्या पदावर राहत राष्ट्रीय अध्यक्ष खासदार मा.शरदचंदजी पवार साहेब,मा. आमदार राजेन्द्रजी शिंगने साहेब यांच्या विचाराने पक्षाच्या ध्येय धोरना नुसार 20 टक्के राजकारण 80 टक्के समाज कारण करत विविध पदावर राहून रफ़ीक शेख यांनी विकास कामा करिता आन्दोलनाच्या माध्यमातून उन्द्री गावाचा उदयनगर नांमकरणाचा प्रश्न,गावातील खामगांव- जालना रोड़ चौपदरी करण करण्याचा प्रश्न,बाळापुर-वरवंड रस्त्याचे उदयनगर(उन्द्री) चौफुली 90 मीटर रस्त्या अपूर्ण सोडलेला आन्दोलन द्वारे मंजूर करणे, अल्पसंख्याक समाजाचे घरकुल, गावात कचरा संकलन घंटा गाड़ी अशा अनेक प्रश्नाना वाचा फोडन्याचे कामे केली तसेच अनेक विकास कामे व अपंग बाँधवांचे प्रश्न असो गावातील प्रलंबित विकास कामे समस्या असो आंदोलन, निवेदना द्वारे सोडवून घेतल्या,उदयनगर ग्रामपंचायत सदस्य असताना 5 वर्षात त्यांच्या वार्ड क्र 5 मध्ये अंदाजे 55 ते 60 लक्ष रु निधिचे कॉन्क्रीट रोडची कामे झाली तसेच मुस्लिम कब्र्स्थान, ईदगाह,दर्गाह,अनेक गावातील सामाजिक भौतिक सुविधा कामे मार्गी लावून घेतली.तसेच संजय गांधी निराधार योजनेच्या अशासकीय सदस्य या माध्यमातून त्यांनी उदयनगर व परिसरातील निराधार मार्गदर्शन शिबिर घेऊन निराधार योजने बाबत जनजागृती केली व अनेक गरजु लाभार्थ्याना लाभ सुरु करून देण्यास सहकार्य केले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांच्या सुरु असलेल्या समाजसेवा व पक्ष कार्याची दखल घेतली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष एडव्होकेट नाज़ेर क़ाज़ी यांनी रफ़ीक शेख यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा कार्यकार्णीत जिल्हा सचिव पदावर नियुक्ती केली असून त्यांना आज दिनांक 7 नोव्हेम्बर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी मंत्री जिल्हाचे नेते आमदार राजेंद्रजी शिंगणे साहेब यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.या वेळी जिल्हा सरचिटणीस भगवान भाऊ काळे, प्रशांत झीने आदि उपस्थित होते रफ़ीक शेख यांची नियुक्ती झाल्यामुळे त्यांचे कौतुक होत असून राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष संजय भाऊ गाडेकर यांनी त्यांचे सत्कार केले तसेच भगवानराव काळे,राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष दीपक भाऊ म्हस्के,प्रशांत झीने यांनी त्यांचे अभिनंदन करत पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

 

0 9 4 5 4 6
Users Today : 11
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *